अकोला : अकोला (Akola News) जिल्ह्यातील अकोटमध्ये शेतकऱ्यानं खाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पानांचा पानमळा फुलवला आहे. रामचंद्र बरेठिया असं या शेतकऱ्याचं नाव आहेय. 20  गुंठे क्षेत्रावर लावलेल्या या पानमळ्यातून बरेठिया आता लाखोंचं उत्पादन घेतायेत. त्यांच्या या प्रयोगाला कृषी विभागाने मार्गदर्शन करत बळ दिले आहे

रामचंद्र बरेठिया यांनी अकोला जिल्ह्यातील अकोट शहराचं राजकारण गाजवले आहे. अकोटचं नगराध्यक्षपद भूषवलेले रामूकाका  आता मात्र शेतीचं क्षेत्र  त्यांच्या शेतीतील वेगळ्या प्रयोगांमुळे गाजवत आहे. त्यांची अकोटपासून जवळच शेती आहे. या शेतात त्यांनी खाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कलकत्ता पानांचा मळा फुलवला आहे. अकोट हे कधीकळी विदर्भात पानांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला तालुका आहे. मात्र, अलिकडे हे पानमळे हळूहळू लुप्त होत आहेत. मात्र, बरेठिया यांनी आपल्या शेतातील 20 गुंठे क्षेत्रावर शेडनेट उभारुन कलकत्ता पान मळ्याची शेती साकारली आहे. यासाठी त्यांनी कलकत्ता मीठा पान लालदांडीचे पाच हजार वेलीचे रोप कोलकाता येथून मागवले आहे. त्यांना एक लाख पाच हजार रूपयांची ही रोपं मिळाली आहे

 या शेतीसाठी त्यांना आधार  युट्यूब आणि कृषी विभागाचा मिळाला.  त्यांना नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत अंतर्गत शेडनेट हाऊस मिळालंय. साडेबारा लाख रुपये खर्चून शेडनेट हांऊसची उभारणी केलीय. यासाठी त्यांना 80 टक्के शासकीय अनुदान लाभलंय. पुढे मातीचीही चाचण्या म्हणजेच तपासणी त्यांनी करून घेतल्या आहे. गेल्या आठ महिन्यापूर्वी शेडनेट हाऊस उभ केलं असून पुढील तयारीला लागले. शेडनेट हाऊसमध्ये मल्चिंग पेपर आणि ठिंबक सिंचन त्याशिवाय पाण्याचे फवारे तयार केले आहेत. कलकत्ता पान लागवडसाठी त्यांना अडीच लाखांपर्यत खर्च आला आहे. वर्षातील आठ महिने हे पिक मिळणार आहे. पुढील दहा ते बारा वर्ष या पानगळ्यातून उत्पन्न मिळणार आहे. 

शेतात सद्यस्थित पाच हजार वेली आहेत. पहिल्या तोडणीमध्ये प्रत्येकी वेलीची पाच पान तोडण्यात येईल. अशाप्रकारे महिन्यातून तीन वेळा म्हणजेच पहिल्यां तोड्यात 25 हजार दुसऱ्या तोडणीत 25 अन् तिसऱ्या तोडणी 25 हजार असे एकत्रित महिन्यात 75 हजार पान विक्रीसाठी उपलब्ध होतील. एक कलकत्ता पान तीन ते पाच रूपयांपर्यत जाऊ शकते. त्यानुसार महिन्याभराचं उत्पन्न दीड ते दोन लाखांपर्यंत असू शकणार आहे.  

 शेतीत मळलेल्या वाटा सोडत नवे प्रयोग करणं ही काळाची गरज आहेय.पारंपारिक शेती केल्या जात असलेल्या विदर्भात ही पानशेती नव्या बदलाची नांदी ठरणारं उदाहरण म्हणता येईल. इतर शेतकऱ्यांनी पानशेतीचं महत्व आणि अर्थशास्त्र समजून घेतल्यास हे बदल आणखी वेगानं घडतील यात शंकाच नाही.



Source link