Lok Sabha Election 2024लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) रणधूमाळीत राज्यातील अकोला जिल्ह्यातील पश्चिम विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. अकोला लोकसभा आणि अकोला पश्चिम विधानसभेच्या (Akola Lok Sabha Constituency) मतदानची प्रकिया येत्या 26 एप्रिल रोजी पार पडणार आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघात 3 लाख 28 हजार 76 एवढी मतदार आहे. तर त्याकरिता 307 मतदान केंद्रवर निवडणुकांची ही रणधुमाळी रंगणार आहे. या पोटनिवडणुकीची पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून सर्व यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिलीय.

पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज

भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अकोला पश्चिम मतदारसंघात येत्या 26 एप्रिलला पोटनिवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केलीय. अकोला लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा आहे. ज्यामध्ये अकोट, बाळापुर, अकोला पूर्व, अकोला पश्चिम, मूर्तिजापुर, रिसोड या मतदारसंघाचा समावेश आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघात 3 लाख 28 हजार 76 एवढी मतदार असून त्याकरिता 307 मतदान केंद्र असणार आहेत. तर लोकसभा मतदारांची संख्या 18 लाख 75 हजार 637 एवढी आहे. ज्यामध्ये पुरुष मतदार 9 लाख 70 हजार 663 तर महिला मतदार 9 लाख 4 हजार 924 एवढी असून इतर 50 मतदारांचा समावेश आहे. दरम्यान 18 ते 19 वयोगटातील 25 हजार 963 मतदार असून ज्यामध्ये 15 हजार 623 पुरुष आणि 10 हजार 339 महिला तर 1 इतर मतदार असल्याचीही माहिती जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिलीय. 

दुसऱ्या टप्प्यात पोटनिवडणुकीची घोषणा

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार आणि माजी राज्यमंत्री गोवर्धन शर्मा यांच्या विजयाने तब्बल 29 वर्षांनंतर सत्ता मिळवण्यात यश आले होते. मात्र 4 नोव्हेंबर 2023 रोजी गोवर्धन शर्मा यांनी वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाल्याने भाजपची मोठी राजकीय हानी झाली. त्यांच्या निधनाने हा मतदारसंघ रिक्त होता. तर त्यावेळी राज्यात विधानसभा निवडणुकीला एक वर्षांपेक्षाही कमी कालावधी असल्याने पोटनिवडणूक होणार की नाही, असा संभ्रम निर्माण झाला होता. तर अनेक राजकीय पक्षानी संभाव्य पोटनिवडणुकीची शक्यता लक्षात घेता या मतदारसंघातून लढण्याची तयारी देखील सुरू केली होती. अखेर आज केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार आणि आयुक्त सुखविंदर  संधू , ज्ञानेश कुमार यांनी अकोला पश्चिम मतदारसंघात येत्या 26 एप्रिलला पोटनिवडणुक घेण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.

आणखी वाचा 

 

अधिक पाहा..Source link