Akola Crime News अकोला : अकोल्यातील बहुचर्चित चऱ्हाटे कुटूंबियांतील चार सदस्यांच्या हत्याकांडात आज एकाच कुटुंबातील तिघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. अकोला जिल्ह्यातील (Akola Crime News) अकोट न्यायालयानं आज, शुक्रवारी हा महत्वपूर्ण  निकाल दिलाय. एडीच एकर शेतीच्या वादातून बहि‍णीने पतीच्या आणि पोटच्या दोन मुलाच्या मदतीनं सख्या दोघां भावांसह त्यांच्या 2 मुलांना असे एकत्रित चौघांना संपवलं होतं. 28 जून 2015 ची घटना असून तब्बल 9 वर्षांनंतर न्यायालयाने आज  हा निर्णय दिला आहे.

दरम्यान, या प्रकरणात हरिभाऊ राजाराम तेलगोटे, द्वारकाबाई हरिभाऊ तेलगोटे आणि मुलगा कुंदन हरिभाऊ तेलगोटे या तिघांना न्यायालयानं दोषी ठवरत मृत्यु दंडाची शिक्षा सुनवाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात आणखी एक मारेकरी मुलाचा समावेश असून तो अल्पवयीन आहे. सध्या बाल न्यायालय मंडळात त्यांचे प्रकरण सुरु आहे.

शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील चार सदस्यांची हत्या

या प्रकरणात बाबुराव सुखदेव चऱ्हाटे (वय 60, नोकरी, शिक्षक) आणि धनराज सुखदेव चऱ्हाटे (वय 50 वर्ष), गौरव धनराज चाऱ्हाटे (वय 19), शुभम धनराज चाऱ्हाटे (वय 17) असे चारही मृतकांची नावे आहे. मृत धनराज आणि बाबुराव यांची सख्खी बहिण द्वारकाबाई आणि पती हरिभाऊ आणि पोटच्या 2 मुलांच्या मदतीनं शेतीच्या वादातून 28 जून 2015 रोजी धारदार शस्त्रांनी निर्घृण खून केला होता.

या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यातील ग्राम मालपुरा गावात शेतीच्या जमिनीवरुन हे ह्त्याकांड घडलं होतं. त्यानंतर तब्बल 9 वर्ष न्यायालयात हे प्रकरण सुरू होतं. अखेर आज अकोटच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणी तिघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

 व्यावसायिक अरुणकुमार वोरा अपहरण प्रकरणात 5 जणांना अटक

अकोला शहरातील ख्यातनाम काच बॉटल सप्लायर आणि व्यावसायिक अरुणकुमार वोरा (Arunkumar Vora) यांच्या अपहरण प्रकरणात (Crime News) अकोला पोलिसांना (Akola Police) मोठं यशं हाती आलंय. तसेच पोलिसांना अपहरण प्रकरणात मोठा खुलासा देखील केलाय. यात अपहरण करणाऱ्या पाच व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे. अरुणकुमार यांच्या अपहरण प्रकरणात मुख्य संशयित आरोपी मिथुन उर्फ मॉन्टी इंगळे याच्यासह 5 लोकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

त्यांच्याकडून गुह्यात वापरण्यात आलेली कार आणि दोन बनावट देशी कट्टे तसेच चार मोबाईल फोन देखील पोलिसांनी जप्त केले आहे. अरुणकुमार यांच्या अपहरण प्रकरणात 1 कोटि रुपयांची डिमांड अपरहरणकर्त्यांकडून झाली होती, अशी माहिती देखील पोलिसांच्या तपासणीतून पुढे आली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..Source link