अकोला : अकोल्यातील (Akola Crime News)  घटनेने राज्यातील महिला आणि मुली खरंच सुरक्षित आहेत का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अकोल्यात एका गावगुंडाने एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अक्षरश: अमानवी अत्याचार केलेयेत. पिडीत मुलीला सिगारेटचे चटके देत, तिचं मुंडन करीत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आलाये. यानंतर तिला सार्वजनिक स्थळी विवस्त्र करत अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला आहे. अकोल्यातील खदान पोलिसांनी आरोपी गुंड गणेश कुमरे उर्फ गणीला अटक करत त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेनंतर  पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) टीकास्र सोडलं आहे. महाराष्ट्राला हादरवणाऱ्या या घटनेबाबत ट्वीट करत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी  गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाण साधला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, एका गावगुंडाची मुलीची विटंबना करुन तिच्यावर अत्याचार करण्यापर्यंत मजल जाते हे अतिशय संतापजनक. कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री सपशेल अपयशी ठरल्याचा हा परिणाम आहे.  कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री सपशेल अपयशी ठरल्याचा हा परिणाम आहे. या गुंडावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला कठोरात कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे.शासनाने त्या दृष्टीने आवश्यक पावले उचलून त्या दृष्टीने उचित कार्यवाही करावी.

अकोल्याची घटना निंदनीय, राज्य महिला आयोगाकडून घटनेची दखल 

अकोल्याची घटना निंदनीय आहे. राज्य महिला आयोगानं याची दखल घेतली असून मी सकाळपासून संबंधित अधिका-यांच्या संपर्कात आहे.  तसेच पोलीस अधीक्षक अकोला यांना पत्र लिहून या प्रकरणात तातडीने कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.आरोपीवर कठोर कारवाई करावी यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती राज्य महिला आयोगच्या अध्यक्ष  रुपाली चाकणकरांनी दिली आहे. 

अकोल्यातील गाव गुंडाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणाची राज्य महिला आयोगाने स्वाधीकारे दखल घेतली असून याबाबत खदान पोलीस स्टेशन यांचेकडून आत्तापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मागविण्यात आला आहे. तसेच पोलीस अधीक्षक अकोला यांना पत्र लिहून या प्रकरणात तातडीने कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.मी स्वतः घटना घडल्यापासून अकोला पोलिस अधीक्षक व तपास अधिकारी यांच्याशी संपर्कात आहे,आरोपीवर कठोर कारवाई करावी यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत.

अकोल्यातील बलात्कारप्रकरण पोलिसांनी गांभीर्यानं हाताळलं नाही : अरूंधती शिरसाट

अकोल्यातील बलात्कारप्रकरण पोलिसांनी गांभीर्यानं हाताळलं नाही,  वंचित बहुजन आघाडीच्या अरुंधती शिरसाट यांनी पोलिसांवर आरोप केला आबे. गुंडानं हैदोस घालत मुलीवर अत्याचार केले.शुक्रवारी या प्रकरणाची माहिती अरूंधती शिरसाट यांना मिळाली आणि या प्रकरणाला वाचा फुटली. 

अकोल्यातील घटना गंभीर: नीलम गोऱ्हे 

अकोल्यातील घटना गंभीर, दोषी आरोपीवर कडक कारवाईचे निर्देश दिल्याची माहिती नीलम गोऱ्हेंने दिली आहे. विरोधकांनी या प्रकरणाचं  राजकारण करु नये,असे वक्तव्य नीलम गोऱ्हेंनी केला आहे. अकोल्यातील घटना गंभीर आहे.या संदर्भात एसपी सोबत बोलणं झालेला आहे. मुलीचे समुपदेशन करायला सांगितला आहे. तात्काळ कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. सरकार आपल्या पद्धतीने प्रयत्न करत आहे मात्र काही ठिकाणी गुंडगिरी सुरू आहे. विरोधकांनीही याच राजकारण केलं नाही पाहिजे जेणेकरून पोलिसांचं मनोधैर्य खच्चीकरण होईल.

हे ही वाचा :

अल्पवयीन मुलीचे मुंडन करून तिच्यावर लैंगिक अत्याचार, सार्वजनिक स्थळी विवस्त्र करण्याचाही प्रयत्न; अकोल्यात गावगुंडाचा हैदोसSource link