अकोला : अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली असून रोडगेच्या जेवणाच्या कार्यक्रमादरम्यान मधमाशांच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत. रेश्मा आतिश पवार असं मृत महिलेचं नाव आहे.
अकोल्यातल्या बार्शीटाकळी तालुक्यातील काजळेश्वर येथे शेतात रोडगे जेवणासाठी मोठ्या उत्साहात स्वयंपाक सुरू असताना अचानक मधमाशांनी हल्ला चढविला. मधमाशांच्या हल्ल्यात आतिश पवार या महिलेचा मृत्यू झाला. प्रकाश पांडुरंग पवार यांच्या शेतात रोडगे जेवणाचं आयोजन करण्यात आलं होतं.
सोमवार दुपारपासून रोडगे पार्टीसाठी तयारी सुरू होती. रोडगेसाठी गोवऱ्या पेटवून रोडगे बनवण्याचे काम सुरू झाले. मात्र, याच गोवऱ्याच्या धुरामुळे जवळील मधमाश्यांचे पोळे फूटले आणि मधमाशांनी नागरिकांवर अचानक हल्ला चढवला. मधमाशांच्या या हल्ल्यात रेश्मा पवार यांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. जखमींमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. त्यांच्यावर अकोल्यातल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
ही बातमी वाचा:
अधिक पाहा..