Akola : अकोल्यात ‘हिट अँड रन’चा थरार पाहायला मिळालाय. अकोल्यातील ‘हिट अँड रन’च्या अपघाताची सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आल्यात. कार चालकाने एका दुचाकीला तब्बल दीड किमीपर्यंत फरफटत नेले.अकोल्यातल्या मोठी उमरी भागातील जिल्हा परिषद शाळेसमोर हा संपूर्ण हिट अँड रन’चा थरार घडला आहे. या कार चालकाने तब्बल एक किमी पर्यंत या दुचाकीला फरफटत नेले.. इतकेच नव्हे तर पुढे चार ते पाच दुचाकी वाहनांना उडवल आहे. या अपघात दोन पेक्षा जास्त जण जखमी झाले.संतप्त नागरिकांनी या कारचा चालकाला बेदम चोप दिलाय. (Hit and Run) दीड किमी अंतरावर नागरिकांनी वाहनाचा पाठलाग केला त्यानंतर अखेर कारचालक हा नागरिकांच्या तावडीत सापडला आणि नागरिकांनी थेट गाडीची तोडफोड केली. या तोडफीडीत वाहनाच्या काचा फोडण्यात आले, त्यासोबतच कार चालकाला बेदम चोप दिलाय. दरम्यान, ही कार एका पोलीस कर्मचाऱ्याची असल्याचे समजते.. सदर कार सोळुंके नामक व्यक्तीची कार असल्याचं बोलल्या जाते पोलिसांनी या कारचा कार चालकाला ताब्यात देखील घेतलेय.
नक्की घडले काय?
अकोल्यातील मोठी उमरी भागात जिल्हा परिषद शाळेसमोर सोमवारी सकाळी एका चारचाकी वाहनाने पाच ते सहा दुचाकींना जोरात धडक दिली आणि यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.विशेष बाब म्हणजे, या कार चालकाने एका दुचाकीस्वाराला तब्बल दीड किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्या पद्धतीने अपघात घडला आणि कार न थांबवता पुढे नेण्यात आली, त्यामुळे उपस्थितांनी प्रचंड संताप व्यक्त केला.अपघातानंतर संतप्त जमावाने कारचा पाठलाग करत दीड किमी अंतरावर कार थांबवली. त्यानंतर जमावाने कार चालकाला पकडून त्याला चोप दिला. इतकंच नव्हे तर जमावाने गाडीची जोरदार तोडफोड केली. गाडीच्या काचा फोडण्यात आल्या आणि वाहनाचे मोठं नुकसान करण्यात आलं.
घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. प्राथमिक माहितीनुसार, ही कार एका पोलीस कर्मचाऱ्याच्या नावे असून, ‘सोळुंके’ नामक व्यक्ती याचा वापर करत असल्याचं समजतं. पोलिसांनी तात्काळ कारचालकाला ताब्यात घेतलं असून, अपघाताबाबत सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.या प्रकरणी सिव्हिल पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक यांनी माहिती दिली आहे की अनेकांचे प्राण धोक्यात आले. नागरिकांचा संताप स्वाभाविक आहे. कायद्याप्रमाणे कारवाई केली जाईल.या घटनेमुळे अकोल्यात चर्चेचा विषय ठरलेली ही ‘हिट अँड रन’ प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून कडक पावलं उचलली जातील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
हेही वाचा:
अधिक पाहा..