Maharashtra Politics अमरावती : अमरावती मतदारसंघात महायुतीची (Mahayuti) डोकेदुखी दिवसागणिक आणखी वाढत असल्याचे चित्र आहे. कारण राणा दाम्पत्याविरोधात शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul), त्यांचे पुत्र अभिजित अडसूळ (Captain Abhijeet Adsul) आणि प्रहारचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी देखील नवनीत राणा (Navneet Rana) यांच्याविरोधात दंड थोपटले आहे. त्यामुळे त्यांच्यात रोज आरोप-प्रत्यारोंप आणि टीकेची झोड रंगताना हल्ली बघायला मिळत आहे. अशातच आमदार रवी राणा यांनी आता पलटवार करत आनंदराव अडसूळ आणि बच्चू कडू यांची भूमिका कटप्पा सारखी असून त्यांनी पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे.
आनंदराव अडसूळ, बच्चू कडू कटप्पाच्या भूमिकेत
शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसुळ यांना मी सन्मान दिला. पण आनंदराव अडसूळ यांनी एका महिलेबाबत किती पातळी सोडून बोलायचं, त्यांनी त्याचे सुद्धा भान ठेवलं पाहिजे. मी महायुती मधून बाहेर पडायचं की नाही, हे सांगणारे अडसूळ कोण? त्या बाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय तो निर्णय घेतील आणि ठरवतील. मी आजही महायुतीमध्ये आहे. उद्याही महायुतीमध्येच राहील. पण त्यांनीच 15 दिवसाचा अल्टिमेट दिला होता. मला जर राज्यपाल पद मिळालं नाही तर मी विचार करेल. असे ते म्हणाले होते.
मुळात आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये काम केलं होतं सिटी को-ऑपरेटिव बँकमध्ये अजून पर्यंत त्यांच्यावर आरोप पत्र दाखल झालं नाही. त्यांनी त्या ठिकाणी मोठा घोटाळा केलाय. त्यामुळे आनंदराव अडसूळ असो की बच्चू कडू यांनी कटप्पाच्या भूमिकेमध्ये राहून पाठीत खंजीर खुपसला आहे. अशा शब्दात आमदार रवी राणा यांनी पलटवार करत निशाणा साधला आहे.
33 महिन्याच्या सरकारमध्ये त्यांनी का दिवा लावला नाही?- रवी राणा
आमदार बच्चू कडू यांनी आज अचानक शरद पवार यांची भेट घेतली. या विषयी भाष्य करताना आमदार रवी राणा म्हणाले की, राजकारणामध्ये प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाच्या भेटी घेत असतो. जे मुद्दे त्यांनी मांडले ते मुद्दे ज्यावेळेस ते अडीच वर्ष मंत्री होते, तेरा खात्याचे मंत्री आणि ते जलसंधारण मंत्री होते तेव्हा त्यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये कोणतं मोठं काम केलं ते त्यांनी सांगावं. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील पुनर्वसनचे काम सुद्धा केले नाही. त्यांच्या अचलपूर मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात संत्र्याचे पीक घेतलं जातं. मात्र अजूनही एक संत्रा प्रक्रिया उद्योग त्यांनी उभारला नाही.
निवडणूक आल्यानंतर शेतकऱ्यांचे नाव घेऊन ते राजकारण करत आहे. बच्चू कडू यांनी सर्वात आधी अपंग कल्याण शाळा स्वतःच्या संस्थेत घेतली, त्या ठिकाणी किती विद्यार्थी आहे आणि किती लोकांची ग्रँड घेते आहेत, हे पहावं लागेल. शिवभोजन योजना पण त्यांनी स्वतःच्या घरात घेतली. शेतकऱ्या बद्दल जर त्यांना जिव्हाळा असता तर 33 महिन्याच्या सरकारमध्ये त्यांनी का दिवा लावला नाही? असा सवाल करत रवी राणांनी बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधला आहे.
हे ही वाचा
अधिक पाहा..