अकोला : अकोला (Akola Crime News) हत्येच्या घटनेने हादरलं आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि क्षणार्धात होत्याच नव्हतं झालं. अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातल्या तळेगाव खुर्द गावात घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.. रेणुका ढोले असं मृत पत्नीचे नाव आहे, तर गजानन ढोले असं पतीचे नाव आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ढोले या दामत्य पती-पत्नीमध्ये वाद होते. शेतीच्या कारणावरून हे वाद सुरू आहे, तसेच गजानन हा पत्नी रेणुका हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता, त्यातून दोघांची भांडण झाली आणि त्या रागात पतीने पत्नीला घरातच वार करून तिची हत्या केली. आयुष्यभरासाठी निवडलेला जोडीदार हाच वैरी बनला आणि मृत्यू काळ बनून आला.
समोर आलेल्या माहितीनुसार, अकोल्यातील तळेगाव बाजार शेतशिवरात ही घटना घडली आहे. पत्नी रेणुका ढोले हे आज शेतात पेरणी करण्यासाठी आले असता तेथे पती गजानन पोहचला तिथे वाद घालण्यास सुरूवात केली. वाद सुरू झाल्यानंतर त्याने पत्नीला शेतात पेरणी करायला विरोध केला. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली आणि त्यांचा हा वाद विकोपाला गेला. गजाननने रागाच्या भरात थेट रेणुकाच्या अंगावर आणि हातावर कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात रेणुका गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
पत्नीच्या हत्येनंतर पती फरार
घटनेची माहिती मिळताच हिवरखेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेचा पंचनामा करून मृतदेह वैद्यकीय तपासणी साठी रुग्णालयात पाठवला आहे. दरम्यान या प्रकरणात हिवरखेड पोलिसांनी खुनाचे गुन्हे दाखल केले असून अधिक तपास करीत आहे. दरम्यान मारेकरी गजानन ढोले हा सध्या फरार आहे.
चारित्र्यावर संशय घेत अनेकदा वाद
मारेकरी गजानन हा पत्नीच्या चारित्र्यावर घेत संशय होता. नेहमी त्यांच्यात किरकोळ गोष्टीवरून वाद व्हायचे. या वादादरम्यान रेणुकाच्या माहेरच्यांनी अनेकदा गजानन यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्यातले वाद कायम असायचे. तसेच गजाननने आपली शेती पत्नी रेणुकाच्या नावाने केलेली होती, याच शेतीत ती पेरणी करण्यासाठी माहेरवरुन आली असता त्यांच्यात वाद होऊन प्रकरण विकोपाला गेले आहे.
हे ही वाचा :
Pune Accident Video: आळंदीत भांडणाच्या रागातून अल्पवयीन मुलाने महिलेच्या अंगावर कार घातली, अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ
अधिक पाहा..