Akola News अकोला : बातमी आहे क्रुरतेचा कळस गाठनारी आणि हृदय पिळवटून टाकणारी. मुक्या प्राण्यासोबत झालेला क्रूरतेचा प्रकार अकोल्यातून समोर (Akola News) आलाय. सोनू देशमुख नावाच्या व्यक्तीनं शेजारच्या घरातला कुत्रा आपल्या घरासमोर भुंकतो म्हणून त्याचे चक्क डोळे फोडत अमानुष मारहाण केलीये. देशमुखने इतर चारजणांच्या मदतीने कुत्र्याला हॉकी स्टीक आणि काठीने अमानुष मारहाण (Beating of Dog) केलीये. या मारहाणीत कुत्र्याचे डोळे फोडून त्याचा जबडा आणि इतर ठिकाणी फ्रॅक्चर करण्यात आलंये. याप्रकरणी संशयित आरोपी सोनू देशमुखसह इतर चौघांवर रामदासपेठ पोलिसांत (Akola Police) गुन्हे दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटणेमुळे परिसरातून मुक्या श्वाना बाबत हळहळ तर मारेकर्‍यांबद्दल रोष व्यक्त केला जात आहे. 

लाठी-काठीनं बेदम मारहाण, चक्क दोन्ही डोळे फोडले, कंबर ही  फ्रॅक्चर 

अकोल्यातील तापडियानगर भागातील मोहन भाजी भंडारजवळ घडलेल्या एका घटनेनं माणुसकी ओशाळलीये. येथील रहिवासी असलेल्या सुनिता सोनोने या महिलेकडे साधारणत: पाच वर्षाचा पाळीव कुत्रा आहे. शेजारीच राहणाऱ्या सोनू देशमुख याने कुत्र्याचा सततच्या भुंकण्याचा आवाज कानावर पडतो म्हणून कुत्र्यासोबत भयंकर कृत्य केलंय. चार जणांच्या मदतीने त्याने क्रूरतेचा कळस गाठत कुत्र्याचे हातपाय बांधले. पुढं लाठी-काठीनं बेदम मारहाण केलीय. हात कुत्र्याचे डोळे फोडण्यात आलेय. त्यानंतर या कुत्र्याला बांधलेल्या अवस्थेत कचऱ्याच्या गाडीत टाकून दिले. या संपूर्ण प्रकरणात अकोल्यातील पशूप्रेमींनी पोलीस तक्रार दाखल केलीय. रामदास पेठ पोलिसांनी यात गुन्हे दाखल केला आहे. मात्र हा संपूर्ण प्रकार माणुसकीला काळीमा फसणारा असल्याची प्रतिक्रिया आधार फॉर ऍनिमलच्या अध्यक्षा काजल राऊत यांनी व्यक्त केली आहे. 

सध्यास्थितीत या कुत्र्यावर अकोल्यातल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र मारहाणीत कुत्र्याचे दोन्ही डोळे निकामी झाले असून कंबर ही  फ्रॅक्चर झालीये. तर त्याच्या अंगावर अनेक गंभीर जखमा झाल्याचं उपचार करणार्‍या डॉ अभिनव सोनटक्के यांनी सांगितलंय. या संपूर्ण प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणी नेमकी काय कारवाई करते हे ही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link