Akola News अकोला : राज्यात जवळ जवळ सर्व जिल्ह्यात पावसाने  (Rain) दमदार हजेरी लावली आहे. असे असले तरी जून महिना उलटून देखील अद्याप अपेक्षेप्रमाणे पाऊस (Vidarbha Weather Update) पडला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशातच ऐन पावसाळ्यात अकोला शहरात जलसंकट उभं राहीलंय. उद्यापासून म्हणजेच 1 जुलैपासून शहराला केवळ आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा होणार आहे. त्यामागील कारण म्हणजे मान्सून सुरू होऊन महिना उलटलाय. परंतू, अकोल्याला (Akola News) पाणीपुरवठा करणाऱ्या महान येथील काटेपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पुरेसा पाऊस पडला नाहीये. त्यामुळ धरणामध्ये पाण्याची पातळी वाढलेली नाहीये.
 
सद्य:स्थितीत काटेपूर्णा प्रकल्पामध्ये 11.34 दलघमी म्हणजे 12.77 टक्केच उपयुक्त जलसाठा आहे. आणखी काही दिवस पाऊस लांबल्यास पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होण्याची चिन्हे असल्याचे चित्र आहे. त्यामुळ अकोला पाटबंधारे विभागानं महान धरणांवरील पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी कपातीचे धोरण लागू केलेय. त्याचाच एक भाग अकोला शहराला (Akola News) आता पाच दिवसांनंतर होणार पाणीपुरवठा आता थेट तीन दिवसांनी वाढून आठवड्याभरावर करण्याचा निर्णय अकोला महापालिकेने घेतलाय. 

अकोला जिल्ह्यातील प्रकल्पांची सद्यस्थिती 


 प्रकल्प   जलसाठा (दलघमी) टक्केवारी(%)
महान 11.34 12.77
वान 12.86 27.89
मोर्णा   9.77 23.57
निर्गुणा   3.05 10.57
उमा 1.90    16.26
दगडपारवा 3.70 36.31

भंडाऱ्याच्या 45 हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा

राज्य सरकारनं जाहीर केलेल्या बजेटमधील घोषणेमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 2023-2024 या वर्षात झालेल्या अवकाळी पावसामुळं 44,926 शेतकरी बाधित झाल्याची नोंद महसूल प्रशासनाकडं आहे. या शेतकऱ्यांच्या वर्षभातील एकूण नुकसानीपोटी 38 कोटी 10 लाख 4 हजार 237 रुपयांचा निधी मिळण्याची अपेक्षा वाढली आहे. मागील वर्षभरात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी आणि गारपिटीचा मोठा तडाखा बसला होता. यामुळे भातपीकासह अन्य पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं.

शुक्रवारी जाहीर झालेल्या बजेटमध्ये राज्य सरकारनं नोव्हेंबर, डिसेंबर,2023 मधील अवकाळी पावसामुळं राज्यातील बाधित शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली आहे. जिल्हा प्रशासनानं मागील तीन वर्षापासून बाधित असलेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी आणि बाधित क्षेत्राची माहिती राज्य सरकारकडं पाठविकेली आहे. त्यामुळं सरकारकडून आता प्रत्यक्ष किती मदत मिळये याकडं शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..Source link