Maratha Reservation : मराठा समाजात सध्या ओबीसीमध्ये असलेल्या कुणबी समाजानं मोठं मन करावं. मराठ्यांना कुणबीचं जात प्रमाणपत्र देण्यासाठी ओबीसीतील कुणबींचं मन वळवण्याचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रसचे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलं आहे. इतर जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या, अशी अजित पवारांसह पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांची भूमिका आहे. अशातच अमोल मिटकरींच्या नव्या भूमिकेनं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
अमोल मिटकरी यांच्या घरासमोर आत्मक्लेष आंदोलन सुरु
मराठा आंदोलकांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या घरासमोर आत्मक्लेष आंदोलन सुरु केलं आहे. त्यामुळं अकोल्यातील न्यू तोष्णीवाल लेआऊट भागातील घरासमोर पोलिसांचा प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, आंदोलन सुरु धाल्यानंतर आमदार मिटकरी यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा देखील केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी मराठ्यांना कुणबीचं जात प्रमाणपत्र देण्यासाठी ओबीसीतील कुणबींचं मन वळवण्याचं आवाहन केलं.
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस
सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. या मुद्द्यावरून राज्यभरात मराठा समाजाची आंदोलने, निदर्शने सूरू आहेत. आमदारांची घरे, पक्ष कार्यालये पेटवली जातायत. एकूणच मराठा समाज आरक्षण घेण्याच्या मागणीवर पेटून उठला. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी जरांगे पाटलांचे उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा नववावा दिवस आहे. जरांगेंनी काल रात्रीपासून पाणी पिणे देखील बंद केलेय. अशात आज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी सरकारचे शिष्ठमंडळ जाणार आहे.शिष्ठमंडळाकडून जरंगे पाटील यांची समजूतकाढून सरकारला थोडा वेळ देण्यातयावा यासाठी विनंती करून आंदोलन मागे घ्यावे अशीही विनंती केली जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: