Akola Crime : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तहसील कार्यालयाअंतर्गत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने गळ्याला दोर लावत आत्महत्या केली आहे. शिलानंद तेलगोटे असं आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. कधीकाळी कवितेच्या माध्यमातून बायकोवर जीव ओवाळून टाकणाऱ्या शिलानंद तेलगोटे यांनी आयुष्य संपण्यापूर्वी एक स्टेटस ठेवलं. या स्टेटसमध्ये त्यांनी बायकोला चेहरा सुद्धा दाखवू नका, असं लिहिलंय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
शिलानंद तेलगोटेंनी कधीकाळी बायकोवर जीव ओवाळणाऱ्या कविता लिहिल्या होत्या. मात्र, त्याच बायकोच्या भावामुळे शिलानंद यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आणि त्यांनी मरताना बायकोला माझा चेहरा देखील दाखवू नका, असं म्हणत आत्महत्या केली आहे.
स्टेटसमध्ये शिलानंद तेलगोटेंनी काय म्हटलंय?
मी श्री शिलानंद माणिकराव तेलगोटे वय २९ रा तेल्हारा शाहू नगर गाडेगाव रोड तेल्हारा.. मी दि ३०/०३/२०२५ रोजी आत्महत्या करत आहे. माझ्या मुत्यु माझी पत्नी नामे प्रतिभा नेलगोटे हे असून मला खूप अश्लील शिव्या देते. माझ्या मुला समोर आणि मला फाशी घेय असे वारंवार सांगते. माझे पैसे तिचा भाऊ श्री प्रविण गायगोले असुन त्याच्या कडे त्यांना शेतीसाठी मी काही रक्कम दिली सदर रक्कम मी तलाठी कडून काढली. त्यांचे व्याज व्याज देणे अपेक्षित आहे कारण माझ्या पगार मधुन रक्कम कटोती सुरु आहे. माझ्या मुत्यु झाल्यास माझी शेवटची ईच्छा माझी PM होणार नाह चहेरा…माझा चेहरा पत्नीला दाखवू नये कारण आज मी ५ दिवस झाले मी जेवम केले नाही. माझी पत्नी ला सोडून कोणालाही चेहरा दाखवा.
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तहसील कार्यालय अंतर्गत कार्यरत पटवारी शिलानंद तेलगोटे यांची गळफास घेऊन आत्महत्या. ‘व्हाट्सअप’वर स्टेटस ठेवून थार येथील एमआयडीसीमध्ये घेतला गळफास. पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं ‘स्टेट्स’मध्ये नमूद केलं आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तेल्हारा येथील ग्रामीण पाठवण्यात आलाय. पत्नीला मृत्यूनंतर आपला चेहरा पाहू न देण्याची विनंती. पत्नीने आर्थिक आणि मानसिक छळ केल्याचा स्टेटसमधून आरोप करण्यात आलाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..