Amol Mitkari On Amol Kolhe : शरद पवारांनी (Sharad Pawar) सुनेत्रा पवारांना (Sunetra Pawar) बाहेरून आलेल्या पवार संबोधल्याने मोठं राजकीय रणकंदन माजलंय. ज्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोललेत त्या पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर शरद पवारांच्या या वक्तव्यावर हसणाऱ्या खासदार डॉ. अमोल कोल्हेंवर (Amol Kolhe) आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) जोरदार टीका केलीये. डॉ. कोल्हेंच्या हसण्याची तुलना त्यांनी दुर्योधन, दु:शासन आणि रावणाच्या हसण्याशी केलीय. डॉ. कोल्हे आपल्या आई आणि पत्नीवर असं वक्तव्य झाल्यावर असेच हसले असते का? असा सवाल त्यांनी यावेळी बोलताना उपस्थित केलाय. डॉ. कोल्हेंच्या या हसण्याचा बदला मतदानातून शिरूरची जनता नक्कीच घेणार असल्याचही अमोल मिटकरी म्हणालेय. शरद पवारांना असं विधान नक्कीच शोभणारं नसल्याचं ते म्हणालेय. 

त्या जागी तुमची आई, पत्नी असत्या तर…

हा वाद घरगुती जरी वाटत असला तरी शरद पवार यांनी जे वक्तव्य केलंय त्याचा सर्वच पक्षातून निषेध होत आहे. याबाबत आता स्वतः सुनेत्रा पवारांनी सांगितले आहे कि, पवार कुटुंबियांनी त्यांना सून म्हणून निवडलं. मात्र, बारामतीकरांनी त्यांना एक उमेदवार म्हणून निवडले आहे. त्यामुळे जनता त्यांच्या पाठीमागे सक्षमपणे उभी राहील. मात्र ही पत्रकार परिषद सुरू असताना खासदार पदावार असलेले डॉ. अमोल कोल्हे ज्या उन्मादात हसत होते हे बघता आम्हाला अमोल कोल्हेंनां असा प्रश्न विचारायचा आहे की त्या जागी तुमची आई, किंवा पत्नी असत्या तर ते अशाच प्रकारे हसले असते का? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा हक्क आहे. कधीकाळी अजित पवारांच्या मदतीने अमोल कोल्हे त्या मतदारसंघातनं खासदार म्हणून निवडून आले आहेत. तेथील स्थानिकांना वाटलं असेल की खासदार बदलावा तर त्यात गैर काय, मात्र खासदार अमोल कोल्हे ज्या उन्मदातं हसले ते हास्य इतिहास कधीही विसरणार नसल्याचेही अमोल मिटकरी म्हणाले. 

खान हाक मारितो हसरी

अशा पद्धतीने कुणावर हसणं हे अतिशय विकृतीच दर्शन घडवणारे असून ‘खान हाक मारितो हसरी’ हे पोवाड्यातील कवन खासदार अमोल कोल्हेंवर लिहिण्यात आले आहे का, याचा तपास केला पाहिजे. असे देखील अमोल मिटकरी म्हणाले. ज्याप्रमाणे दुर्योधन, दु:शासन आणि रावण हसले होते त्याच पद्धतीने हसण्याचा पाप कोल्हे यांनी केले आहे. कोल्हेंच्या प्रवृत्तीचे खरे दर्शन या निमित्ताने समोर आले आहे. मात्र याचा हिशेब सर्वसामान्य जनता त्यांच्याच मतदारसंघातून घेतल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही अमोल मिटकरी यांनी बोलताना व्यक्त केलाय.

इतर महत्वाच्या बातम्या  

अधिक पाहा..Source link