Akola News: अकोलाछगन भुजबळ (Chhagan Bhujbal) सरकारमध्ये राहून मुख्यमंत्र्यांना विरोध करत मराठा समाजाच्या (Maratha Reservation) विरोधात जर भूमिका घेत असतील तर, त्यांना कमरेत लाथ घालून सरकारमधून बाहेर काढा, असं वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केले आहे. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशातच आता आमदार संजय गायकवाड यांनी मंत्री छगन भुजबळांना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. 

कथित ऑडियो क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल

मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरोधात मंत्री छगन भुजबळांनी आपला विरोध दर्शविला आहे. त्यांच्या या भूमिकेला विरोध दर्शवत सत्तेत सहभागी असलेले शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य करत भुजबळांना कमरेत लाथ घालून सरकारमधून बाहेर काढा,असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधाऱ्यांमधील वाद परत एकदा चव्हाट्यावर आला असून आणखी वाद पेटण्याचे चिन्ह आहे. या वादग्रस्त वक्तव्यानंतर कल्याण चे दुर्गेश बागुल यांनी आमदार गायकवाड यांना फोन करून याबत जाब विचारलं असता गायकवाड यांनी दुर्गेश बागुल यांच्यासह मंत्री छगन भुजबळांना अश्लील भाषते शिवीगाळ केल्याची कथित ऑडियो क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आली आहे. मात्र अद्याप या क्लिप मागील सत्यता समोर आली नसली तरी या संभाषणामुळे नवा वादंग उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

 

शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि दुर्गेश बागुल यांचे संभाषण  

दुर्गेश बागुल –  हॅलो 

आमदार संजय गायकवाड – हॅलो..

दुर्गेश बागुल – आमदार संजय गायकवाड यांचा नंबर आहे ना हा ..

आमदार गायकवाड – कोण बोलते ..

दुर्गेश बागुल – दुर्गेश बागुल बोलतो ..

आमदार गायकवाड – कुठून … 

दुर्गेश बागुल – कल्याण ..

आमदार गायकवाड – हा बोला ..

दुर्गेश बागुल – साहेबांनी आता काय स्टेटमेंट दिले ते ..

आमदार गायकवाड – दिलं ना** त्या भुजबळच्या .. माज आला त्याला … त्याचं *****… काय म्हणणे आहे तुह्यावाले…

दुर्गेश बागुल – साहेब हे तुम्ही चुकीचे बोलता …

आमदार गायकवाड – **** खानदान ही खतम करतो **** मी ..

दुर्गेश बागुल – साहेब ऐका हो ऐका …. .आम्ही सुद्धा शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत ..

काय म्हणाले संजय गायकवाड?

महाराष्ट्रात बहुसंख्या असलेल्या मराठा समाजाला सापडलेल्या नोंदीनुसार आणि सगेसोयऱ्यांसह प्रमाणपत्र देण्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली. पण मराठा आरक्षण विषयाच्या आमच्या मागणीपासूनच छगन भुजबळ यांनी तिरस्कारची विषारी भूमिका घेतली आहे. प्रत्येक वेळेला मराठा समाजाच्या बाबतीमध्ये अतिशय वाईट भूमिका घेऊन मराठा समाजाला ओबीसीचे प्रमाणपत्र कसे मिळणार नाही अशाच प्रकारचे प्रयत्न त्यांनी केले आहे. आज राज्यामध्ये 54 लाख नोंदी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे साहेबांच्या प्रयत्नांमुळे मिळाल्या. जवळ जवळ 39 लाख लोकांना सर्टिफिकेट देण्यात आले. परंतु त्यांना प्रमाणपत्र देऊ नये याकरता छगन भुजबळांनी समाजामध्ये आवाहन केले आहे.

जेणेकरून मराठा समाजाला हे आरक्षण मिळायला नको. परंतु भुजबळांना मला सांगायचं आहे की, ज्या 57 लाख नोंदी ओबीसींच्या सापडलेल्या आहेत, त्यांना कुणाचा बाप देखील आरक्षणापासून रोखू शकत नाही. तो त्यांचा हक्क आहे. गेल्या 70 वर्षापासून ते या विषयाकरता वंचित राहिले आणि म्हणून भुजबळ हे सरकारमध्ये राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजावर विषयी विरोधी भूमिका घेत असतील तर माझे मुख्यमंत्र्यांकडे आवाहन असेल की,  भुजबळांना कमरेत लाथ घालून सरकारमधून बाहेर काढा, असं वादग्रस्त वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. आता कुणाचा बापही मराठा आरक्षण रोखू शकणार नाही, असं आव्हान देखील गायकवाड यांनी भुजबळांना दिलंय. 

अधिक पाहा..



Source link