Akola Crime News : अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापुर (Murtijapur) तालुक्यातल्या सिरसो गावातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात जुन्या वादातून दोन चुलत भावांमध्ये कुटूंबातील जुन्या वादातून राडा झाला आहे. या राड्यातील तूफान हाणामारी झाली असून त्यात एकाचा मृत्यू झालाय. तर यात 8 जण गंभीर जखमी झालेय. हे दोन्ही कुटूंब पारधी समाजातील असून सिरसोमधील पारधी बेड्यावर ही घटना घडलीय. लाठ्या, काठ्या, कुर्हाड आणि दगडांनी दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला केलाय. या वादात सुरज भोसले या 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. त्याच्या डोक्यात कुर्हाडीचा वार लागल्याने तो गंभीर स्वरूपात जखमी झाला आणि जागेवरच मरण पावलाय.
19 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, 8 जण गंभीर
यासोबतच त्याचे वडील आणि भाऊसुद्धा गंभीर जखमी झालेयेत. गंभीर जखमींना उपचारासाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेय. तर काही जखमींवर मुर्तिजापूरच्या लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरूयेत. या संपूर्ण घटनेत पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले. या वादाचे काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा संपूर्ण वाद इतका विकोपाला गेला की थेट हत्येपर्यत पोहोचला. या संपूर्ण प्रकरणात मुर्तीजापुर पोलीस अधिक तपास करतायेत. सध्या सिरसो गावातील पारधी बेड्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाये.
अकोल्यातील करण चितळे हत्याकांड प्रकरणी 7 जणांना अटक
अकोल्याच्या खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेतवन नगरमध्ये रविवारी सायंकाळी घडलेल्या करण चितळे हत्याकांडाच्या तपासाला गती मिळालीये. काल प्रेम प्रकरणाच्या वादातून करणसह तिघांवर चाकूने हल्ला करण्यात आला होताय. यात करणचा मृत्यू झालाय. तर दोन गंभीर जखमींवर अकोला जिल्हा रूग्णालयात उपचार सुरूयेत. पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सहा जणांना अटक केलीये.. यामध्ये 28 वर्षीय मयूर श्रावण मस्के, 24 वर्षीय प्रशिक राजेश जावळे, 28 वर्षीय निखिल सुभाष कांबळे, 20 वर्षीय संगम सोनकांबळे यांच्यासह 3 अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आलीये. तर एका अज्ञात आरोपीचा शोध सुरूये. काल सायंकाळच्या सुमारास चाकूने वार करून करण चितळे याची हत्या करण्यात आली होतीये.. याबाबतचा अधिक तपास खदान पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहेय. आपल्या मैत्रिणीकडे का बघतो?, या वादातून करणची हत्या करण्यात आल्याचं बोललं जातंय. पोलीस तपासातून आणखी काही गोष्टी समोर येण्याची शक्यता आहेय.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..