Chandrashekhar Bawankule :  दिशा सालीयन प्रकरणी (Disha Salian case) जोपर्यंत पोलीस अंतिम आकलणावर येत नाहीत तोपर्यंत मी त्यावर बोलन योग्य नाही असे वक्तव्य मंत्री चंद्रेशखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलं आहे. तसेच यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसह सजंय राऊत यांच्यावरही टीका केली. 2047 पर्यंत आता शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसला वाव नाही. संपूर्ण देश मोदींजीसोबत आहे असे वक्तव्य मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. विरोधी पक्षात त्यांनी चांगलं काम करावं त्यासाठी त्यांना मी शुभेच्छा देतो असेही ते म्हणाले. वक्फ बोर्डाने जी जागा बळगवली आहे, त्या जागा परत मिळाव्यात यासाठी सरकार काम करणार आहे असेही बावनकुळे म्हणाले. 

महाराष्ट्र संजय राऊतांना ऐकायला तयार नाही 

संजय राऊत (Sanjay Raut) यांचं मला काहीच ऐकू येत नाही आणि महाराष्ट्र त्यांना ऐकायला तयार नाही असा टोला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांनी भगव्याचा विचार सोडला आहे. म्हणून मी म्हटलं की, उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर झाले आहेत, आता ते अध्यक्षही होतील असा टोला बावनकुळे यांनी लगावला. 

उद्धव ठाकरे यांचे खासदार नाशिक, परभणी आणि धाराशिवमध्ये निवडून आले आहेत. त्यांनी रॅलीत पाकिस्तानचे झेंडे फडकवले होते. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व पायदळी तुडवलं असल्याची टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. बाळासाहेब यांनी सांगितले होते की, ज्या दिवशी मला काँग्रेससोबत जावं लागेल त्यादिवशी मला दुकान बंद करावं लागेल असे बावनकुळे म्हणाले. 

नितेश राणे हे हिंदू विरोधात काम करणाऱ्यांबद्दल बोलतात

नितेश राणे हे हिंदू विरोधात काम करणाऱ्यांबद्दल बोलतात. पाकिस्तान जिंकली तर फटाके फुटतात. हे लोक फायदा या देशाचा घेतात पण गुण पाकिस्तानचं गातात असेही बावनकुळे म्हणाले. देशविरोधी षडयंत्र रचले जाते त्यावर नितेश राणे बोलत आहेत. रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. लवकरच अंतिम बैठक या आठवड्यात होणार आहे. तो फार मोठा हा विषय नाही पण यावर निर्णय होईल असे ते म्हणाले. समाजामध्ये तेड निर्माण होणार नाही यावर सगळ्यांनी भर दिला पाहिजे असेही ते म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

हिंदुत्व आमच्या DNA मध्येच, उद्धव ठाकरेंकडे औरंगजेब फॅन क्लबचे नेतृत्व, बावनकुळेंचा हल्लाबोल, म्हणाले, पंतप्रधानांवर बोलण्याची तुमची पात्रता नाही 

अधिक पाहा..



Source link