अकोला : दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या सात जणांना अकोला पोलिसांनी गजाआड केलं आहे. धक्कादायक म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींमधील सर्व आरोपी हे वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगार आहे. अकोला पोलिसांनी या आरोपींकडून एक बनावट देशी पिस्टल आणि सात जिवंत काडतूस, दरोडा साहित्यसह 7.85 हजार रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
संबंधित आरोपी हे एका ठिकाणी दरोडा टाकणार असल्याची टीप पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी प्लॅन करून सर्व आरोपींना पकडण्याचा प्लॅन केला. अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात खामगावकडून येत असताना या टोळीला नाकाबंदीदरम्यान पकडण्यात आले. तपासणी दरम्यान वाहनात देशी पिस्टल आणि काही इतर साहित्य आढळून आल्याने या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला.
राहुल भगवान खिल्लारे (वय 26, रा. शाहूनगर हिंगोली), ऋतिक कल्यानसव वाढवे (वय 21, पिंपळखेड जि. हिंगोली), सुर्यकिरण बळीराम चोरमल (वय 23, इसापूर स्मना, हिंगोली), अंकुश रगेश कंकाल (वय 22, सावरगाव (बडी) वाशिम), नितेश मधुकर रहनचय (वय 33, वाशिम), सुमित शेषसय पुंडगे (वय 22, पिंपळखेड जि. हिंगोली) आणि देवानंद अमृता इंगोले (वय 26, रा. सावळी, वाशिम) असे ताब्यात घेतलेल्या सात लोकांची नावे आहेत.
या प्रकरणाचा तपास अकोला पोलिस करत आहेत. आरोपींच्या या टोळीत इतरही गुन्हेगारांचा समावेश आहे का याचा तपास करण्यात येणार आहे.
अकोल्यात सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न
सावकाराला शेतीचाताबा घेण्यास विरोध करणाऱ्या युवकाला ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न सावकार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केल्याची घटना अकोल्यातील मनब्दा गावात घडली आहे. 17 मे रोजीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
मनब्दा गावातील गतमने कुटुंबीय आणि सावकार मंगेश आणि निलेश शेळके यांच्यात शेतीच्या ताब्यावरुन वाद (Farm Land Dispute) सुरु आहेत. हा वाद सध्या न्यायालयात असताना शेळके यांनी शेतीवर ताबा घेण्याचा प्रयत्न केलाय. या प्रयत्नाला विरोध करणाऱ्या गतमने कुटुंबीयांवर सावकार शेळके आणि त्यांच्या गुंडांनी हल्ला चढवला. यात संदीप गतमने (Sandeep Gatmane) याला ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहेय. तर वडील हरिभाऊ गतमने यांच्यावरही धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. याप्रकरणी तेल्हारा पोलीस स्टेशन मध्ये सावकारखसह आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही बातमी वाचा :
अधिक पाहा..