Agriculture News : तुर उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Tur Farmers) एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. तुरीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळं तुर उत्पादकांना चांगला फायदा मिळत आहे. या आठवड्यात अकोल्यात तुरीला (Tur) या हंगामातील सर्वोत्तम भाव मिळाला आहे. अकोल्यात (Akola) सध्या तुरीचे भाव 12000 ते साडेतेरा हजाराच्या दरम्यान आहेत.
अकोल्यात उच्च प्रतीच्या तुरीला 13 हजार 800 रुपयांचा दर
या आठवड्यात अकोल्यात तुरीला हंगामातील सर्वोत्तम भाव मिळाला आहे. अकोल्यात तुरीचे भाव सध्या 12000 ते साडेतेरा हजाराच्या दरम्यान आहेत. दोन दिवसांपुर्वी अकोल्यात उच्च प्रतीच्या तुरीला 13 हजार 800 रुपयांचा प्रती क्विंटल भाव मिळाला होता. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या तुरीची आवक सुरु झाली आहे. यावर्षी तुरीला सरकारनं 7000 रूपये किमान आधारभूत मुल्य दिलं आहे. मात्र, सध्या हमीभावापेक्षा तुरीला ज्यादा दर मित आहे.
हंगामाच्या सुरुवातीला तुरीच्या घरात झाली होती घसरण
यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला तुरीचे भाव पडल्याने तूर उत्पादक शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र, अलीकडे बाजारात तुरीच्या वाढत्या मागणीमुळे तुरीला अच्छे दिन आल्याची परिस्थिती आहे. अकोल्यात सध्या तुरीला सरासरी 12000 एवढा सरासरी भाव प्रति क्विंटलला मिळत आहे. मात्र, या वाढलेल्या भावाचा फारसा फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याची खंत काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या आठवड्यात अकोला बाजार समितीत तुरीला मिळालेला सर्वोच्च भाव
तारीख सरासरी भाव (प्रती क्विंटल)
08 जून 13905
09 जून 12920
10 जून 13800
11 जून 12500
12 जून 11300
महत्वाच्या बातम्या:
पोलिसाची नोकरी सोडून शेतीत रमला, आज तुरीच्या पिकातून तरुण करतोय लाखोंची कमाई
अधिक पाहा..