Akola News अकोला : अकोल्यातून (Akola News) एक मोठी बातमी समोर आली आहे. अकोल्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या ताफ्यात सुरक्षा यंत्रणेची चूक समोर आलीय. देवेंद्र फडणवीस यांचा ताफा मुख्य राष्ट्रीय महामार्गावर लागला तरी फडणवीसांच्या सुरक्षा यंत्रनेतील पोलिसांचा ताफा हा कृषी विद्यापीठातच होता. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेची ही मोठी चूक समोर आली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातल्या (Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth) विश्रामगृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार असं सुरक्षा यंत्रणेला वाटलं होतं. मात्र फडणवीस यांचं वाहन थेट मुख्य महामार्गावर लागल्याने त्यांच्या ताफ्यातील मागील सुरक्षा यंत्रणेचा ताफा हा मागेच राहिला. यात पोलिसांचे वाहन आणि ॲम्बुलन्स इतर वाहने मागेच राहिले होते.

पोलिसांमध्ये काही काळ प्रचंड गोंधळाचे वातावरण

याआधीही फडणीसांच्या ताफामध्ये अकोल्यात अशीच चूक झाली होती. आता पून्हा अकोल्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुरक्षा पुरवणाऱ्या यंत्रणेची चूक समोर आली आहे. त्यांनतर काही काळ पोलिसांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला होता. दरम्यान, भाजपचा जिल्हास्तरीय मेळावा आटोपल्यानंतर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस शिवनी विमानतळावरून नागपूरकरकडे प्रस्थान केलंय. एकुणात या संपूर्ण प्रकारामुळे पोलिसांमध्ये काही काळ प्रचंड गोंधळाचे वातावरण बघायला मिळाले.  

अकोल्यात भाजपाच्या जिल्हा विस्तारित कार्यकारिणीचा आज महामेळावा आयोजित करण्यात आला होता. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात हा महामेळावा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील पाच हजारांवर पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकारी या महामेळाव्याला उपस्थित होते. भाजप खासदार अनुप धोत्रे यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे सर्व आमदारही या महामेळाव्याला उपस्थित झाले होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रकृती ठीक नसल्याने ते या कार्यक्रमाला आले नाहीत. यावेळी हा गोंधळ झाल्याचे बघायला मिळाले 

आमदार भास्कर जाधव यांचा आजचा अकोला दौरा रद्द

अकोल्यातून अशीच एक राजकीय बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांचा आजचा अकोला दौरा रद्द झालाय. खराब हवामानामुळे त्यांचं विमान चुकल्याने हा दौरा रद्द झालाय. ते मुंबईतून नागपूरला विमानाने येणार होते. तेथून रस्ता मार्गाने ते अकोल्यात येणार होते. आमदार भास्कर जाधव यांचा अकोला जिल्ह्यातील पातूर शहरात आज कार्यक्रम होता. आमदार नितीन देशमुख यांच्या विकासनिधीतून पातूर येथील रेणुका टेकडीवरील मंदिराच्या सभामंडपाचे भूमिपूजन होणार होतंय. यासोबतच ते पातूर आणि अकोल्यात कार्यकर्त्यांना संबोधित करणार होते. मात्र आता आमदार भास्कर जाधव यांचा आजचा अकोला दौरा रद्द झालाय. 

इतर महत्वाच्या बातम्या 

कुरियरद्वारे कोट्यवधीच्या अमली पदार्थांची तस्करी; एनसीबी कडून आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश, सहा जणांना ठोकल्या बेड्या

अधिक पाहा..



Source link