अमरावती : लोकसभेच्या कालात नवनीत राणांची जात काढली आणि त्यांना मतदान करू नका असं विरोधकांनी सांगितलं, आता ते लोक परत आले तर त्यांना जोड्याने मारा असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केलं. नवनीत राणा यांचा पराभव झाल्याने अमरावतीचे न भरून निघणारे नुकसान झाल्याचंही ते म्हणाले. अनिल बोंडे यांनी अमरावतीच्या एका कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केलं. 

अनिल बोंडे म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात नवनीत राणा या जातीच्या, त्या जातीच्या असं सांगून त्यांना मतदान करू नका असा विरोधकांनी प्रचार केला. आता तेच लोक तुमच्याकडे पुन्हा येणार आहेत, ते परत आले तर त्यांना जोड्याने मारा. 

नवनीत राणांच्या पराभवामुळे अमरावतीचे नुकसान

अनिल बोंडे म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांचा एखादा नेता येतो आणि नवनीत राणा या वेगळ्या जातीच्या आहेत, त्यांना मत देऊ नका असं सांगतो. त्यामुळे नवनीत राणांचा पराभव झाला आणि आपण आपलं नुकसान करून बसलो. नवनीत राणांच्या पराभवामुळे अमरावतीचे न भरून येणारं नुकसान झालं आहे. 

नवनीत राणा यांना पाडल्याचा काही लोकांना विकृत आणि विखारी आनंद झाला असं खासदार अनिल बोंडे म्हणाले. माझ्या जोडीला लोकसभेत नवनीत राणा यांना पाठवले असते तर चांगले झाले असंही ते म्हणाले. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..



Source link