Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज अकोल्यात (Akola) महायुतीची (Mahayuti) जाहीर सभा होत आहे. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची प्रमुख उपस्थिति असणार आहे. अकोल्यातली डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मैदानावर ही भव्य सभा होत आहे. पश्चिम विदर्भातल्या वऱ्हाड भागातील अकोला, वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील 15 मतदारसंघांसाठी ही मोदींची जाहीरसभा होत आहे . दरम्यान या सभास्थळी पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रतापराव जाधव, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसुळ, खासदार अनुप धोत्रे व्यासपीठावर उपस्थित आहेत. यासोबतच अकोला, बुलढाणा आणि वाशिममधील महायुतीचे सर्व उमेदवार मंचावर उपस्थित.
दरम्यान, या सभास्थळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी आपल्या खास शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कविता करत जोरदार फटकेबाजी केली आहे. “मोदीसाहेब अकोल्यामध्ये येत आहे आत्ता.. मग का येणार नाही राज्यामध्ये महायुतीची सत्ता? पंतप्रधान आहे पळणारा चित्ता, म्हणून तर गिरवत आहेत विकासाचा कित्ता” असे म्हणत पंतप्रधान मोदींच्या सभेत रामदास आठवलेंनी कवितेतून जोरदार फटकेबाजी केली आहे.
आम्ही दोघंही एकत्र येऊ, सोबत मिळून थोडं-थोडं खाऊ- रामदास आठवले
“महायुतीच्या बाजूने आम्ही हाय, कारण आमचं नाव आहे आरपीआय” असेही रामदास आठवले यावेळी म्हणाले. तुकड्या-तुकड्या विखुरलेला समाज एकत्र करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावे, असे म्हणत प्रकाश आंबेडकरांच्या बालेकिल्ल्यात आठवलेंनी पुन्हा एकदा आंबेडकरांना एकीची साद आठवले यांनी घातली आहे. आंबेडकरांनी पक्षाचं अध्यक्ष व्हावं. मी दुसरं पद घेईल. मी त्यांना मोदींकडे घेऊन जाईल. आम्ही दोघंही एकत्र येऊ, सोबत मिळून थोडं-थोडं खाऊ, अशा मिश्किल शब्दात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केलंय.
नरेंद्र मोदी बाबासाहेब आंबेडकरांशी एकनिष्ठ आहेत
नरेंद्र मोदींना हटवू पाहणाऱ्याला आम्ही मिटवल्याशिवाय राहणार नाही. 370 कलम हटविण्याचा निर्णय क्रांतीकारी आहे. नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेसला काश्मिरमध्ये परत 370 कलम आणायचे आहे. या देशाचे संविधान कुणीच बदलवू शकत नाही. राहुल गांधी संविधानाचे पुस्तक दाखवत ते संविधान बदलायच्या गोष्टी करतात. मात्र नरेंद्र मोदी बाबासाहेब आंबेडकरांशी एकनिष्ठ आहेत. असेही रामदास आठवले म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..