Akola Crime News : अकोल्यात (Akola) काल मध्यरात्रीच्या सुमारास चोरटयांनी चांगलाचं धुमाकूळ घातलाय. अकोल्यातल्या गौरक्षण रोडवरील एका प्रतिष्ठित उद्योगपतीच्या बंगल्याला काही अज्ञात चोरट्यांनी लक्ष करून तब्बल 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल चोरून (Crime News) नेलाय. दरम्यान, प्रतिष्ठीत उद्योगपती ब्रिजमोहन भरतीया यांच्या निवासस्थानी ही चोरी झालीय. भरतीया याचं कुटुंब गाढ झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या मागील बाजूस खिडकी तोडून आता प्रवेश केला. त्यानंतर या अज्ञातांनी सोनं-नाण्यांसह चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकत्रित 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल पळवून नेला आहे. 

आज्ञातांनी पळवला कोट्यांवधीचा मुद्देमाल

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच खदान पोलिसांसह अकोला पोलिसांच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच पोलीस अधीक्षक बच्चन सिंग हे देखील घटनास्थळावर दाखल झाले. त्यानंतर त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. गुरुवारच्या रात्री दोन दिवसांपूर्वीच अकोल्यातील आलेगाव इथं 3 घरात चोरी झाली होती. या घरातून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. त्यानंतर आता पुन्हा अकोल्यातून मोठी चोरीची घटना समोर आली आहे. प्रतिष्ठित उद्योगपती भरतीया यांच्या निवासस्थानी चोरट्यांनी धुमाकूळ घालत तब्बल दीड ते 2 कोटी रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची शक्यता वर्तविली जात आहे. परिणामी, ही चोरीची घटना गांभीर्याने घेत  स्थानिक गुन्हे शाखेसह खदान पोलिसांचे पथके तयार करून चोरट्यांच्या शोधात रवाना करण्यात आले आहे. 

पोलिसांकडून आज्ञात चोरट्यांचा शोध सुरू 

याप्रकरणी खदान पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करताय. तसेच पोलिसांकडून आसपास परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केल्या जात आहे. सोबतच श्वान पथकही घटनास्थळी दाखल झाले. प्रथमदर्शनी घरात असलेली सर्व रोख रक्कम चोरी केल्याची माहिती पुढे आली आहे. ही रक्कम जवळ जवळ 2 कोटी़च्या घरात असल्याचे समजते आहे. तरीही अद्याप किती रूपयांची चोरी झाली हे समजू शकले नाहीये. आलीकडे शहरात चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..Source link