Akola News : अकोला (Akola) रेल्वे स्थानकावर चालती ट्रेन पकडणं दोन व्यक्तीच्या चांगलंच अंगलट आलं असतं. रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर एक व्यक्ती चालत्या कामाख्या एक्सप्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता. त्याच वेळी त्याचा तोल (Accident) गेल्याने प्रवाशी व्यक्ती ट्रेन अन् प्लॅटफॉर्मच्यामध्ये पडू लागला. पण रेल्वे स्थानकावर (Akola News) असलेल्या रेल्वे पोलिसांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत या दुर्घटनेतून या व्यक्तीची सुखरूप सुटका केली आहे. त्यामुळे क्षणात घडलेल्या या अपघातात सुदैवानं या व्यक्तिचा जिव वाचला आहे.  

प्रसंगावधान राखत रेल्वे पोलिसांनी वाचवले दोघांचे प्राण

तर अशीच एक दुसरी घटना काल, सोमवारी अकोला रेल्वे स्थानकावर घडली. या घटनेत एक महिला चालत्या रेल्वेमध्ये चढत असताना महिलेचे संतुलन बिघडलं, आणि महिला ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये जात असताना पोलीस कर्मचारी योगेश तांबस्कर यांनी सुखरूपपणे या महिलेला यातून वाचवले आहे. हा संपूर्ण प्रकार अकोला रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. दरम्यान, काळ आला होता पण वेळ आली नव्हती, असाच काहिसा प्रकार हा अकोला रेल्वे स्थानकावर घडला आहे. या घटनेनंतर वेळीच रेल्वे थांबवण्यातं आली. तसेच स्थानकावर मोठी गर्दीही झाली होती. मात्र, त्यानंतर काही वेळाने रेल्वे पुढील प्रवासासाठी रवाना झाली. या दोन्ही घटनेत पोलिसांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होतंय.

लोकलमधून पडून दोघांचा मृत्यू, एकाच आठवड्यात घेतला दोघांचा बळी

लोकलमधून (Mumbai Local) प्रवास करताना एका आठवड्यात डोंबिवलीतील दोघांचा मृत्यू झाला आहे. डोंबिवलीतून मुंबईला कामाला जाणाऱ्या दोघांचा लोकल प्रवासादरम्यान तोल जाऊन मृत्यू झाला आहे. सकाळी कोपर ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान  रिया राजगोर या तरुणीचा लोकलमध्ये प्रवास करत असतांना तोल जाऊन मृत्यू झाला तर 23 तारखेला अवधेश दुबे या तरुणाचा डोंबिवली ते  मुंब्रा दरम्यान लोकलमधून प्रवास करताना तोल जाऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोकल अपघातांचे प्रमाण कमी होत नसल्याने रेल्वे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. 

लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी  सकाळी आठ ते  साडे आठच्या सुमारास  कोपर ते दिवा रेल्वे स्थानका दरम्यान रिया शामजी  राजगोरे या तरुणीचा लोकलमध्ये प्रवास करत असतांना तोल जाऊन मृत्यू झाला आहे.  तर 23 एप्रिललाअवधेश दुबे या तरुणाचा डोंबिवली ते मुंब्रा दरम्यान लोकलमधून प्रवास करताना तोल जाऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  डोंबिवलीत राहणारी  रिया ही  मुंबईमध्ये नोकरीला होती. नेहमी प्रमाणे   सकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकातून मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या लोकलध्ये चढली.मात्र लोकलमध्ये गर्दी असल्याने रियाने दरवाज्याजवळ उभे राहून प्रवास केला.कोपर ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान रियाचा तोल जाऊन ती लोकल मधून खाली पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..Source link