अमरावती: लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश बाजूला सारुन महायुतीने विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय चमत्कार करुन दाखवला. विशेष म्हणजे या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांनाही दारुण पराभवाला समोर जावे लागले होते. दरम्यान, राज्याचे लक्ष लागून राहीलेल्या अचलपूर विधानसभा मतदारसंघातही असाच धक्कादायक निकाल लागल्याचे बघायला मिळाले. यात परिवर्तन महाशक्तीचे (Parivartan Mahashakti) घटक असलेले आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे (Prahar Janshakti Party) अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना परभवाचा जबर धक्का बसला. तर अचलपूर विधानसभेत भाजपचे प्रवीण तायडे यांनी दणदणीत विजय मिळवत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. दरम्यान या पराभवानंतर बच्चू कडूंनी पहिल्यांदाच आपल्या पराभवाचं कारण सांगत भाजपच्या अजेंड्यावर टीका केली आहे. तसेच सेवेचा झेंडा हरल्याची प्रतिक्रिया ही त्यांनी या वेळी दिली आहे.

धार्मिक राजकारणात आमचा सेवेचा झेंडा हारला – बच्चू कडू

धार्मिकता, मुस्लिमांचा फतवा आणि हिंदूंचा बटेंगे तो कंटेंगे या सगळ्या धार्मिक राजकारणात आमचा सेवेचा झेंडा हारला. इतका निधी आणूनही मला 67 हजार मत भेटली. अशी खंत विधानसभेच्या पराभवानंतर  पहिल्यांदाच बच्चू कडूंनी बोलून दाखवली आहे. दरम्यान, पुढील रूपरेषा ठरवण्यासाठी लोकांच्या प्रतिक्रिया घेऊन येत्या 2 तारखेला शेगाव या ठिकाणी अधिवेशन घेणार आणि त्यापूर्वी 29 तारखेला जिल्हा प्रमुखांची मुंबईत बैठक घेणार. असेही बच्चू कडू म्हणाले. 

शिंदे साहेबांची दावेदारी एकदम बरोबर- बच्चू कडू

पुढील बैठकीत चार प्रश्न आम्ही लोकांना विचारणार आहोत. सत्ता का सत्तेच्या बाहेर, झेंडा का सेवा. यावर ज्या प्रतिक्रिया येतील त्यावर आम्ही समोर जाऊ. बंडखोरी जर एकनाथ शिंदे यांनी केली नसती तर भाजप सत्तेत आली नसती. त्यामुळे शिंदे साहेबांची दावेदारी बरोबर आहे. असेही बच्चू कडू म्हणाले. 

मानहानीजनक पराभवानंतर बच्चू कडू ‘ॲक्शन मोड’वर

विधानसभेतील मानहानीजनक पराभवानंतर बच्चू कडू ‘ॲक्शन मोड’वर आले आहे. दरम्यान 29 नोव्हेंबरला राज्यातील पक्षाच्या सर्व पराभूत उमेदवारांची बैठक बच्चू कडूंनी मुंबईला बोलवली आहे. या बैठकीत पराभूत उमेदवारांसह पक्षाचे राज्यभरातील पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष हे उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरला प्रहारची चिंतन बैठक होणार आहेत. तर या बैठकीत बच्चू कडू पक्षाची पुढची दिशा ठरवणार आहे. बच्चू कडू स्वतः अचलपूर मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष होता परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीत सहभागी होता. या दरम्यानच्या काळात तिसऱ्या आघाडीच्या प्रचारासाठी बच्चू कडूंनी राज्यभरात विक्रमी सभा घेतल्या होत्या. तरीही त्यांना मोठ्या पराभवाला समोर जावे लागले आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link