Akola Hit And Run News : राज्यातील हिट अँड रनच्या (Hit And Run) घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच आता अकोल्यातून (Akola) देखील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका भरधाव वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली आहे. ही धडक इतकी जोरदार होती की यात आईसह 9 महिन्याच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर वडील आणि वर्षाचा मुलगा हे गंभीर जखमी झाले आहेत. अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील व्याळाजवळ ही घटना घडली आहे. दुचाकीला धडक दिल्यानंतर चारचाकी वाहन चालक भरधाव वेगाने वाहन घेऊन फरार झाला आहे.
बाळापुर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद
अकोल्यातील हातरुण येथील उस्मान खान रहमान खान (38) हे त्यांची पत्नी व दोन मुलांसह दुचाकीने (क्र. एमएच 30 एएम 7539) अकोल्यातून वाडेगाव येथे जात होते. व्याळानजीक आले असता अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक देऊन घटनास्थळावरुन पोबारा केला. या अपघातात उस्मान खान यांची पत्नी कशफ (28) यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगी अनाया फातेमा (9 महिने) हिचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला. उस्मान खान व त्यांचा मुलगा सदीम खान (5) हे गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांवर अकोल्यातल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी अकोला जिल्ह्यातीलच बाळापुर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.
राज्यातील सर्वच प्रमुख शहरांत दिवसेंदिवस हिट अँड रनच्या घटनांमध्ये वाढ
राज्यातील सर्वच प्रमुख शहरांत दिवसेंदिवस हिट अँड रनच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच मुंबई पुण्यासह अनेक शहरात या घटनांमध्ये कमालीची वाढ होत असल्याचे दिसत आहे. अशा घटनांना कारणीभूत ही मद्यधुंद अवस्थेतील तरुणाई आहे. काही बिल्डरपुत्र आहेत तर काही राजकीय पदाधिकाऱ्यांची मुलं देखील आहेत. त्यामुळे कायद्याच्या चौकटीचं भय या बड्या नेत्यांच्या मुलांना राहिलेलं दिसत नाही. बेफिकीरपणे वाहने चालवताना तरुणाई दिसत आहे. मात्र, त्यामुळं बळी जातात ते सामान्य निष्पापांचे. ज्यांचा यामध्ये काहीही दोष नसतो, त्यांना दुसऱ्याच्या चुकीमुळं जीव गमवावा लागतो. राज्यात सामान्यांसाठी मरण स्वस्त झालंय का? असा सवाल देखील आता उपस्थित होताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या:
जालन्यात भीषण अपघात! शाळेतून घरी जाणाऱ्या मायलेकीसह चौघांना आयशरची जोरदार धडक, तिघांचा दुर्दैवी अंत, चालक फरार
अधिक पाहा..