Akola News: अकोला : मनोज जरांगे  (Manoj Jarange) यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकराने अध्यादेश काढत मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न मार्गी लावला असल्याचे बोलले जात आहे. तर, आरक्षणासंदर्भात अधिसूचनेनंतर राज्यभरात जल्लोष साजरा केला जात असतानाच दुसरीकडे ओबीसी (OBC ) नेत्यांनी देखील आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. या विरोधात ओबीसी नेते एकवटले असून त्यांनी आव्हान देण्याची तयारी केली आहे.

मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरोधात मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) अद्याप आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे मंत्री छगन भुजबळांना टीकेची झोड देखील सहन करावी लागत आहे. अशातच आता सत्तेत सहभागी असलेले शिवसेनेचे आमदार  संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) हे छगन भुजबळ यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाला केलेल्या विरोधानंतर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून हाकलून द्या, असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेले आहे. 

कमरेत लाथ घालून सरकारमधून बाहेर काढा

एका राज्याच्या मंत्र्याची भूमिका ही कोणत्याही एका समाजाच्या विरोधात असू शकत नाही, असे असेल तर तो मंत्री पदावर राहायच्या लायकीचा नाही. छगन भुजबळ सरकारमध्ये राहून मुख्यमंत्र्यांना विरोध करत मराठा समाजाच्या विरोधात जर भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की, भुजबळांना कमरेत लाथ घालून सरकारमधून बाहेर काढा, असं वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. आता कुणाचा बापही मराठा आरक्षण रोखू शकणार नाही, असं आव्हान देखील गायकवाड यांनी भुजबळांना दिलंय.

काय म्हणाले संजय गायकवाड?

महाराष्ट्रात बहुसंख्या असलेल्या मराठा समाजाला सापडलेल्या नोंदीनुसार आणि सगेसोयऱ्यांसह प्रमाणपत्र देण्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली. पण मराठा आरक्षण विषयाच्या आमच्या मागणीपासूनच छगन भुजबळ यांनी तिरस्कारची विषारी भूमिका घेतली आहे. प्रत्येक वेळेला मराठा समाजाच्या बाबतीमध्ये अतिशय वाईट भूमिका घेऊन मराठा समाजाला ओबीसीचे प्रमाणपत्र कसे मिळणार नाही अशाच प्रकारचे प्रयत्न त्यांनी केले आहे. आज राज्यामध्ये 54 लाख नोंदी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे साहेबांच्या प्रयत्नांमुळे मिळाल्या. जवळ जवळ 39 लाख लोकांना सर्टिफिकेट देण्यात आले. परंतु त्यांना प्रमाणपत्र देऊ नये याकरता छगन भुजबळांनी समाजामध्ये आवाहन केले आहे.

जेणेकरून मराठा समाजाला हे आरक्षण मिळायला नको. परंतु भुजबळांना मला सांगायचं आहे की, ज्या 57 लाख नोंदी ओबीसींच्या सापडलेल्या आहेत, त्यांना कुणाचा बाप देखील आरक्षणापासून रोखू शकत नाही. तो त्यांचा हक्क आहे. गेल्या 70 वर्षापासून ते या विषयाकरता वंचित राहिले आणि म्हणून भुजबळ हे सरकारमध्ये राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजावर विषयी विरोधी भूमिका घेत असतील तर माझे मुख्यमंत्र्यांकडे आवाहन असेल की, त्यांना ताबडतोब घरचा रस्ता दाखवा, असं देखील आमदार संजय गायकवाड म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..Source link