Akola News अकोला : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी अलिकडे घेतलेली भूमिका लक्षात घेता हीच भूमिका त्यांनी पहिल्या दिवशीच घेतली असती तर त्यावर विश्वास बसला असता. मात्र आज त्यांचे चारही बाजूने दरवाजे बंद व्हायला लागले आहे. त्यामुळे हा तुतारीचा माणूस आहे हे साऱ्यांना कळले असल्याची घाणाघाती टीका भाजप आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) मनोज जरांगे पाटील यांच्यावर केली आहे.
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची राजकीय भाषा मराठा समाजाला आवडत नाही. त्यांनी राजकीय भाष्य टाळणं हे त्यांच्यासाठी चांगले आहे. त्यांनी मराठा आरक्षणावर बोललं तर ते त्यांच्या हिताचे आहे. उद्धव ठाकरे, नाना पटोले, शरद पवार यांची भूमिका ओबीसीतून आरक्षण न देता किंवा दुसऱ्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) दिले पाहिजे, अशी आहे. त्यामुळे कुठेतरी जरांगे पाटील एकटे पडत चालले आहे. स्वतंत्र मराठा आरक्षण देण्याची तयारी असल्यास त्यावर जरांगे यांनी भूमीक जाहीर करावी. मनोज जरांगे यांच्या राजकारणामुळे मराठा समाजाचे जर नुकसान होईल, तर मराठा समाज नक्कीच यावर भूमिका घेईल. असेही आमदार नितेश राणे म्हणाले. ते अकोला येथे बोलत होते.
यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांचे नाव खराब होतंय- नितेश राणे
महाराष्ट्र द्वेषाचा ठेका उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. त्यांच्या बुडात घुसलेला धनुष्यबाण पहिले काढावा लागेल. परत एकदा बॅगपॅक करून त्यांना लंडनला पाठवण्याची वेळ आली आहे. तर उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राला लागलेली कीड असून ही लागलेली कीड आम्ही कायमस्वरूपी काढू, अशा शेलक्या शब्दात नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. अकोल्यात हिंदू बाहुबली संमेलनासाठी मी आज जात आहे.
सकल हिंदू समाजाचे हिंदुत्वाचे विषय तेथे मांडले जाणार आहे. पोलीस विभागातील काही अधिकारी हिंदू समातील लव्ह जिहादचे विषय आल्यास 10 ते 15 दिवस केस दाखल करत नाही, आई वडिलांसोबत गौरव्यवहार करताय, अशी माहिती आहे. पोलीस विभागातील या प्रकारामुळे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांचे नाव खराब होतंय. अशा सडक्या आंब्याना त्या पद्धतीचा इशारा आम्ही दिला असल्याचेही नितेश राणे म्हणाले.
महायुतीच सरकार आणण्यासाठी आम्ही तडजोडही करू- नितेश राणे
महायुतीतील जागावाटपात अलिबागच्या जागे संदर्भात नितेश राणे यांना विचारले असता ते म्हणाले की, तीन पक्षाची युती असताना त्या पद्धतीने चर्चा होतेच. प्रत्येकाला वाटते, की ही जागा मलाच मिळाली पाहिजे. त्यामुळे आम्ही एकमेकांचे डोकं फोडू, असं काही होणार नाही. तीनही पक्षाचे नेते बसून योग्य तो निर्णय घेतील. महाराष्ट्रात महायुतीच सरकार आणण्यासाठी आम्ही तडजोडही करू. असेही नितेश राणे म्हणाले.
तर अजित पवार यांनी बारामती लोकसभेतील पराभवावर केलेल्या वक्तव्यावर भाष्य करताना ते म्हणाले की, अजित पवार हे अनुभवी नेते आहेत. कुठल्यातरी अनुभवणे ते हे बोलले असतील. त्यांच्या बोलण्याचा महायुतीवर काही परिणाम होईल, असे इमले बंधू नका, एका वक्तव्याने महायुतीच्या बाहेर ते पडततील असे काहीही नाही. असेही नितेश राणे म्हणाले.
हे ही वाचा
अधिक पाहा..