Akola News अकोला : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या जीवाला धोका असून त्यांच्यावर विष प्रयोगाची शक्यता नाकारता येत नसल्याचा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलाय. जरांगे पाटील यांना दिली जाणारी औषधं, जेवण, इंजेक्शन आणि सलाईन हे सर्व तपासूनच द्यावीत. कारण सध्या राज्यात ज्या पद्धतीने जरांगे पाटलांचे राजकारण चाललंय किंवा त्यांची आंदोलन चाललेली आहेत, त्या आंदोलनामुळे अनेक जणांना धक्का लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता जरांगे पाटील यांनी दक्षता घ्यावी असा सल्ला देखील प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
घातपाताची शक्यता नाकारता येत नाही
मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला काही लोकांपासून धोका. याच्यामागे नेमकं कोण आहे ते सांगणार नाही, मात्र जरांगे यांच्यामुळे अनेकांचा राजकीय भवितव्य धोक्यात आल्याने त्यांच्या घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांना दिले जाणारे जेवण, औषध हे अतिशय विश्वासू व्यक्ती आणि डॉक्टरांच्या समोर दिली जावी. मनोज जरांगे यांनी स्वतःबद्दल दक्षता आणि काळजी घ्यावी. जेव्हा शासनाने जरांगे पाटील यांच्या काळजीपोटी डॉक्टर्स आणि इतर सगळं ठेवलेले आहे, त्याप्रमाणे त्या डॉक्टरला सक्त ताकीद दिली पाहिजे की, जरांगे पाटील यांना काहीही तपासल्या शिवाय अथवा बघितल्या शिवाय देऊ नये. ही व्यवस्था शासन करेल, अशी अपेक्षा माल असल्याचे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.
निजामी मराठ्यांच्या राजकारणाला आव्हान
ज्या पद्धतीने जरांगे पाटील यांचे राजकारण चाललंय किंवा त्यांची आंदोलन चाललेला आहेत, त्या आंदोलनामुळे अनेक जणांना धक्का लागण्याची शक्यता आहे. या धक्क्यामुळे हल्ली बरेच जण धास्तावलेले सुद्धा आहेत. अशा मध्ये जरांगे पाटील हे एक्स्ट्रीम स्टेप घेत आहेत. जरांगे पाटील यांच्या राजकारणामुळे मोठी उलथापालत होत असते. त्यामुळे एक दक्षता म्हणून मी शासनाला या माध्यमातून इशारा देत असल्याचे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असून शासनाने हे गांभीर्याने घेतले पाहिजे. जरांगे पाटील यांनी निजामी मराठ्यांच्या राजकारणाला आव्हान दिले आहे. त्यामुळे ही दक्षता घेऊन त्यांनी काळजी घ्यावी, असा सल्ला देखील प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..