Amravati Crime News : महाप्रसादाला नेतो असं सांगत तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार (Gang Rape) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अमरावतीमधील (Amravati News) हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अमरावती (Amravati Gang Rape News) जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील मालखेडमधील (Malkhed) ही घटना आहे. तरुणीला महाप्रसादासाठी नेतो, असं तिच्या आईला सांगत आरोपीने तरुणीला दुचाकीवर बसवून नेलं आणि घरी कोंडून ठेवलं. त्यानंतर तरुणीला घरी सोडण्याच्या बहाण्यानं बाईकवर बसवून शेतात नेलं आणि तिथे तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पाच जणांनी तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना मन सुन्न करणारी आहे.

23 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

महाप्रसादाच्या निमित्ताने 23 वर्षीय तरुणीला अमरावतीतील मालखेड येथे आणले आणि त्यानंतर परत नेऊन सोडण्याच्या बहाण्याने शेतातील झोपडीत नेऊन पाच जणांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वरुड तालुक्यातील शेंदूरजनाघाट पोलिसांनी आरोपींविरुद्ध अपहरण आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे. महेश वाघमारे, पिंटू हरले, रमेश भलावी, इस्माईल खाँ, नितीन ठाकरे सर्व राहणार मालखेड अशी आरोपींची नावे आहेत. 

नेमकं प्रकरण काय?

आरोपी महेश वाघमारे हा पीडितेला लाहीकरिता म्हणजे महाप्रसादासाठी मालखेड (Malkhed) येथे घेऊन जातो, असे तिच्या आईला सांगून तरुणीला घेऊन गेला. आरोपीने पीडितेला रात्रभर त्याच्या घरी कोंडून ठेवलं. 28 जानेवारी रोजी तरुणीला तिच्या गावी सोडण्यासाठी आरोपी महेशने तिला दुचाकीवर बसवलं. मात्र, त्यानंतर आरोपीनं तरुणीला गावी न नेता दुसऱ्या आरोपीसोबत शेतात नेलं. आरोपी महेशने पिंटू हरले याला सोबतीला घेतलं आणि दुचाकीवर दोघे जण पीडितेला मालखेड शिवारातील शेतात घेऊन गेले. यानंतर दोघांनी शिवारात तिच्यावर अतिप्रसंग केला. यादरम्यान तिथे आणखी तीन आरोपी आले आणि त्यांनीही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याला पीडितने विरोध केला असता, आरोपींनी तिला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. इतकंच नाही तर या घटनेबाबत कुठेही वाच्यता केली तर जीवे मारू अशी धमकीही आरोपींनी तरुणीला दिली होती. याप्रकरणी पीडितेने शेंदुरजनाघाट पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी वेळीच सूत्रे हलवत पाचही आरोपींना अटक केली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..Source link