Akola Crime: अकोला : नाकाला चिमटा लावून मुलगी झोपल्याचा बनाव एका आईनं केला. पण, वैद्यकीय अहवालात या साडेपाच वर्षीय मुलीच्या हत्येचा उलगडा झाला आहे. या प्रकरणात अकोल्यातील खदान पोलिसांनी मुलीची आईला ताब्यात घेतले आहे. अकोला शहरातील बलोदे लेआऊटमधील ही घटना आहे. किशोरी रवी आमले (वय 5) असं मृत मुलीचं नाव असून विजया आमले असं मारेकरी आईचं नाव आहे. या संदर्भात वडील रवी आमले यांनी दिलेल्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुपारच्या वेळी घरात कोणी असतानाच आईनं तिचा काटा काढला असल्याचं समोर येत आहे. तरीही आईनं आपल्या पुढच्या मुलीला का संपवलंय? या मागील गूढ अजूनही कायम आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोरी हिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, लग्नापासून पती-पत्नीमध्ये वाद होते. पत्नीने पतीला घटस्फोटाची मागणी देखील अनेकदा केली आहे. या वादात किशोरीचा बळी गेल्याची चर्चा आहे. 

…अन् आईनं घेतला गोंडस चिमुकलीचा जीव? 

नाकाला चिमटा लावल्यानं चिमुकल्या किशोरीचे प्राण गेले. किशोरी नाकाला चिमटा लावून झोपली आणि तिचा मृत्यू झाला, असा बनाव किशोरीच्या आईने केला होता. किशोरीच्या वडिलांनी आईवरच संशय व्यक्त केला होता. त्यांनी पोलिसांना त्याबाबत माहिती दिली होती. पोलिसांनी या प्रकरणात किशोरीची वैद्यकीय तपासणी केली अन् अहवालाच्या तपासात अनेक नवनवे खुलासे समोर आले. यात नाकाला चिमटा लावून किशोरीचा मृत्यू झाल्याचा केलेला देखावा समोर आला. तर तिच्या अंगावर आणि शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्यात. या महिन्याच्या सुरुवातीला किशोरीच्या अकस्मात मृत्यूची नोंद खदान पोलिसांनी घेतली होती. आता किशोरीची आई विजया आमले हिच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक धनंजय सायरे, सहायक पोलीस निरीक्षक निलेश करंदीकर, पोलीस उपनिरिक्षक निता दामधर आणि पोलीस कर्मचारी आकाश राठोड काम पाहत आहेत.

2 जूनचा दिवस ठरला तिच्यासाठी काळरात्र? 

2 जून 2023 रोजी सकाळी 8 वाजता कामावरुन वडील रवी हे घरी जेवणाकरीता आले, किशोरी ही घरी ट्युशनवरून आलेली होती, त्यानंतर किशोरीने सोबत जेवण केले आणि काही वेळ रूममध्ये खेळले अन् मस्ती केली. पुन्हा थोड्यावेळांनं कामाकरिता घरून दुपारी निघाले. या दरम्यान, पत्नी विजया हिचा फोन आला तिने त्यांना सांगितले की, मी घरातील कामं करत असताना किशोरी ही पलंगावर खेळता-खेळता झोपली होती, कामं संपल्यावर जेवणासाठी किशोरी हिला झोपेतून उठविलं, परंतु किशोरी ही झोपेतून उठत नाहीये, तुम्ही लवकर घरी या असे म्हणाली. लगेच मित्र वैभव हांडे याला फोन केला अन् तो घरी गेला. किशोरी हिला शासकीय रुग्णालयात नेले असता येथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. 

या संदर्भात त्यांनी विजया हिला विचारपुस केली असता तीने सांगितले की, किशोरी ही पलंगावर ओले कपडे घराबाहेर वाळु घालण्याकरीता असलेल्या चिमटयानं खेळत होती, कामे झाल्यानंतर घरात पाहिले असता किशोरी हीचे नाकाला चिमटा लावलेला होता आणि किशोरी ही काहीच हालचाल करीत नव्हती, असे तिने सांगितले.

दरम्यान, घटनावेळी किशोरीची आई ही एकटीच घरी होती, अन्य घरात कोणीच नव्हतं. त्यामुळे सर्व संशय सध्या पोलिसांना तिच्यावर आहे. त्यात वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिच्या आईविरुद्ध गुन्हे दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे.



Source link