Akola News अकोला : अकोला – खामगाव राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू ट्रक आणि दूचाकीचा भीषण अपघात (Accident) झालाय. या अपघातात दुचाकीस्वार दोन जण जागीच मरण पावले आहेत. आज दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास हि अपघाताची घटना घडली आहे. अकोला खामगाव या नव्याने बांधण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर भेगा पडल्याय. त्यामुळे ट्रकला ओव्हरटेक करत असताना दुचाकीच चाक या भेगांमधून गेले आणि अडकलं. त्यानंतर मोटरसायकल स्लिप होऊन ट्रकवर आदळली. या अपघातात एकाचा ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने मृत्यू झालाय, तर दुसरा व्यक्तिला देखील अपघातात जिव गमवावा लागला आहे. सचिन जुनारे आणि शाम महल्ले असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत. 

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार दोघांचा जागीच मृत्यू 

घटनेची माहिती मिळताच वाहतूक आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ गाठत, महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली आहे. या अपघाताप्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. मात्र या अपघतामुळे राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्यामुळे या महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.  

 गुरांच्या गोठ्याला आग, तीन म्हशींचा होरपळून जागीच मृत्यू

वाशिमच्या शिरपूर जैन  शेतशिवार भागातील गोविंदराव देशमुख यांच्या शेतातील गुरांच्या गोठ्याला अचानक आग लागली आहे. या आगीत तीन म्हशींचा होरपळून जागीच मृत्यू झालाय. तर तीन जनावरे आगीत गंभीर जखमी झाले आहेत. शिरपूर  शेतशिवारात गोविंद देशमुख या शेतकऱ्याच्या शेतातील गुरांच्या गोठ्याला काल दुपारी 2 ते 3 वाजेच्या दरम्यान अचानक आग लागली. शेतामध्ये कुणीच हजर नसल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. दरम्यान, गोठ्यामध्ये दोन बैल, चार म्हशी बांधलेल्या होत्या. सदर आगीमध्ये गवताचा गोठा जळून पूर्णपणे खाक झालाय. तर तीन म्हशींचा आगीमध्ये जळून मृत्यू झाला आहे. सोबतच  तीन जनावरे जखमी झाले आहेत. या घटनेत शेतकऱ्याचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

कापूस गोदामला भीषण आग 

अशीच एक आगीची घटना यवतमाळच्या पांढरकवडा येथे घडली आहे. अचानक लागलेल्या आगीत पाच हजार कापूस गठानी जळून खाक झाल्याची घटना घडली. सिबला रोडवर असलेल्या झाझरिया यांच्या कापूस गोडाऊनमध्ये पाच हजार कापूस गठानी ठेवून होत्या. मात्र अचानक आग लागलेल्या आगीने पाहता पाहता रौद्ररूप  धारण केले. दरम्यान, तेथील कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दलाला घटनेची माहिती देताच, अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link