अकोला : अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी आपल्याला राष्ट्रवादीमधून अजित पवार (Ajit Pawar) गटात येण्याची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला होता. यावर भाजप आणि अजित पवारांच्या गटातील अनेक नेत्यांनी उत्तर देखील दिलं होतं. पण यावर आता अमोल मिटकरी यांनीच मौन सोडलं आहे. ‘एबीपी माझा’सोबत संवाद साधताना अमोल मिटकरी यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. आपण लहान कार्यकर्ते असून खडसे हे मोठे नेते आहेत. त्यामुळे मी त्यांना ऑफर देण्याचा प्रश्नच येत नाही, असं स्पष्टीकरण अमोल मिटकरी यांनी दिलं आहे. तर खडेंसना ऑफर राष्ट्रवादीमधले मोठे नेते देतील असं देखील अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. 

मागील अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे यांना अजित पवारांच्या गटातून ऑफर आल्याच्या चर्चा रंगत होत्या. यावरुन राजकिय वर्तुळात देखील अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले होते. पण मी शरद पवारांसोबतच असल्याचं यावेळी एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. त्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला. पण अमोल मिटकरी यांनी ऑफर दिल्याचं खडसेंनी म्हटलं आणि सत्ताधाऱ्यांकडून प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली. तर यावर अमोल मिटकरींनी देखील आता मौन सोडलं आहे. 

काय म्हणाले मिटकरी?

अमोल मिटकरी यांनी एकनाथ खडसेंच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, मी लहान कार्यकर्ता आहे, त्यामुळे खडसेंना ऑफर पक्षातील मोठे नेते देतील. त्यांना पक्षात निमंत्रित करण्यासाठी पक्षाचे मोठे नेते आहेत. अजित पवारांसोबत जर चर्चा करायची असेल तर खडसेंना कोणत्याही मध्यस्थीची गरज नाही. तसेच पुढील काही काळआमध्ये अजित पवारांसोबतच्या आमदार आणि खासदारांची संख्या वाढणार असल्याचा दावा देखील यावेळी अमोल मिटकरी यांनी केला आहे. 

अमोल मिटकरी यांचं सूचक विधान 

सध्या आणखी एक खासदार आणि आमदार अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. यामध्ये शरद पवार गटातील खासदारांची नावं समोर येत असून यामधील कोणता खासदार अजित पवारांकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. यावर सूचक विधान करत अमोल मिटकरींनी म्हटलं की, राज्यातील सर्व अमोल नावाच्या व्यक्तींचं अजित पवारांवर खूप प्रेम आहे. 

दरम्यान एकनाथ खडसे यांचं उत्तर आणि अमोल मिटकरी यांच्या स्पष्टीकरणामुळे आता या वादाला पूर्णविराम मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच यावर आता एकनाथ खडसे देखील काही उत्तर देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

हेही वाचा : 

Jalgoan News : खडसेंनी भाजपमध्ये येण्याचा प्रयत्न करु नये, महाजनांचं टीकास्त्र; खडसेंचही प्रत्युत्तर म्हणाले…Source link