Maharashtra Vidhansabha Election 2024: राज्यात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर राजकीय घटनांना वेग आला आहे. बहुतांश पक्षांच्या आता उमेदवारांच्या पहिल्या याद्या आल्या आहेत. अनेकांनी दुसऱ्या याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, अकोल्यातील मुर्तिजापूरात भाजपमध्ये असंतोष उफाळून आलाय. निमित्त आहे उमेदवारी जाहीर होण्यास विलंब होत असल्याने आमदार हरीश पि़पळेंच्या तिकिट कापल्याच्या चर्चेचं.  मुर्तिजापूरच्या भाजप आमदार हरीश पिंपळे यांचं तिकीट कापलं जाणार अशा भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्याऐवजी ऐनवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून आलेल्या रवी राठींना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याविरोधात मुर्तिपूरात भाजपमध्ये असंतोष उफाळून आला आहे. पक्षाने हरीश पिंपळेंना उमेदवारी दिली नाही तर मतदारसंघातील बुथ प्रमुख, शाखाप्रमुख आणि पदाधिकारी मिळून एकाच वेळी राजीनामा देणार असल्याचा इशारा देत संतप्त कार्यकर्ते एक आले होते.

नक्की झाले काय?

शनिवारी रात्री हरीश पिंपळेंच्या मुर्तिजापूर येथील लकडगंज भागातील घरासमोर मतदार संघातील भाजपचे शेकडो संतप्त कार्यकर्ते एकत्र आलेत. पक्षाने हरीश पिंपळेंना भाजपने उमेदवारी दिली नाही तर मतदारसंघातले 390 बुथ प्रमुख, शाखाप्रमुख पदाधिकारी एकाचवेळी राजीनामा देणार असल्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिलाय. यावेळी हरीश पिंपळे यांच्या समर्थनात मूर्तिजापूर मतदारसंघातले पदाधिकारी आणि बूथ प्रमुखांनी घोषणाबाजी केलीय.. मुर्तीजापुर मतदारसंघात आयात केलेला उमेदवार नको. बाहेरील उमेदवाराला संधी दिल्यास, आपण पक्षाचे काम करणार नाही आणि राजीनामा देणार, असा इशारा या पदाधिकाऱ्यांनी दिलाय… 

नव्या चेहऱ्याला देणार संधी?

मुर्तिजापूर मतदारसंघात रवी राठींऐवजी शरद पवार गटाने सम्राट डोंगरदिवेंना उमेदवारी़ दिली आहे.. त्यामूळे रवी राठी नाराज होते. त्यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देत आपली नाराजी व्यक्त केली होती. आणि भाजपची वाट धरली आहे. 2019 मध्ये रवी राठींनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर मुर्तीजापुरमधून 42 हजार मते घेतली होती. महायुतीत मुर्तीजापुर मतदारसंघ हा भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळं भाजप मुर्तीजापूरमधून विद्यमान आमदार हरीश पिंपळे ऐवजी आता नवीन चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता असल्याचं भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले. अकोला जिल्ह्यातील एकमेव राखीव असलेला विधानसभेचा एकमेव  मतदारसंघ म्हणजे मुर्तीजापूर….मुर्तीजापूर अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. महाराष्ट्र निर्मितीनंतर एक अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत नवीन चेहऱ्याला संधी देणारा मतदारसंघ

मुर्तिजापूर मतदारसंघात 2019 मध्ये पहिल्या तीन उमेदवारांना मिळालेली मते 

भाजपाचे हरीश पिंपळे 1,910 मतांनी विजयी

उमेदवार                   पक्ष             मते 
हरिश पिंपळे             भाजप       59527
प्रतिभा अवचार          वंचित        57617
रविकुमार राठी          राष्ट्रवादी      41155

हेही वाचा:

Murtijapur Assembly Election 2024 : मुर्तिजापुरमध्ये वंचितकडून डॉ. सुगत वाघमारे रिंगणात; भाजप, राष्ट्रवादीचा तिढा सुटेना, कोण मारणार बाजी?

अधिक पाहा..



Source link