Amit Shah Visit Maharashtra : भाजपचे राष्ट्रीय नेते तथा गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आजपासून दोन दिवसीय महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर असणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर भाजपच्या दिल्लीतील नेत्यांचे महाराष्ट्र राज्यातील दौरे वाढले असून, त्यात आता अमित शाह यांची भर पडली आहे. नुकताच गेल्या आठवड्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या दौरा केला असतांना, आता अमित शाह महाराष्ट्राचा दौरा होत आहे. दरम्यान शाहा आपल्या या दौऱ्यात अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहे.

अमित शाह आपल्या महाराष्ट्र दौऱ्यात 5 मार्च रोजी अकोला येथे क्लस्टरच्या बैठकीला हजर राहणार, तसेच जळगावमध्ये युवासंमेलनाला देखील अमित शाह उपस्थित राहणार आहे. यासोबतच छत्रपती संभाजीनगर शहरात शाह यांची जाहीर सभा देखील होणार आहे. 

अमित शाहांचा संभाजीनगर दौरा….

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह हे 4 आणि 5 मार्च रोजी संभाजीनगर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ज्यात सोमवार 4 मार्च रोजी रात्री 10 वाजून 10 मिनिटांनी छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन व हॉटेल राम इंटरनॅशनल कडे रवाना व मुक्काम करतील. दुसऱ्या दिवशी 5 मार्च रोजी सकाळी 10. 35 वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथून हेलिकॉप्टरने अकोलाकडे रवाना होतील. अकोला व जळगाव येथील नियोजित कार्यक्रम आटोपून सायंकाळी 5.40 मिनिटांनी छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे हेलिकॉप्टरने आगमन व हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे आगमन व राखीव असेल. सायंकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी हॉटेल रामा इंटरनॅशनल येथून मोटारीने  क्रांती चौककडे प्रयाणकरतील. क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण, तेथून मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान, खडकेश्वरकडे प्रयाण करतील. सायंकाळी सहा वाजून 35 मिनिटांनी सभेस उपस्थिती व संबोधन करतील. सायंकाळी 7.30 मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावरुन मोटारीने छत्रपती संभाजीनगर विमानतळाकडे प्रयाण. सायंकाळी 7.45 मिनिटांनी विमानाने मुंबईकडे रवाना होतील.

अकोला, जळगाव जिल्ह्याचाही दौरा…

विदर्भातील 6 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अमित शाह मंगळवारी अकोल्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. दुपारी 1 वाजता बैठक आटोपून ते जळगावच्या सभेसाठी रवाना होणार आहे. जळगाव येथे त्यांची जाहीर सभा होणार असून, सायंकाळी 6 वाजता छत्रपती संभाजीनगरला मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर त्यांची दुसरी सभा होणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या : 

Rahul Gandhi Visit Kalaram Temple : मोदींनंतर आता राहुल गांधीही काळाराम मंदिराला भेट देणार; असा असणार दौरा…

अधिक पाहा..Source link