Lok Sabha Second Phase Election 2024 : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात (Lok Sabha Election Second Phase) निवडणूक होणाऱ्या महाराष्ट्रातील 8 लोकसभा मतदारसंघात आज अधिसुचना जारी केली जाणार आहे. ज्यात मराठवाड्यातील (Marathwada) परभणी (Parbhani), नांदेड (Nanded), हिंगोलीसह (Hingoli) विदर्भातील बुलढाणा (Buldhana), अमरावती (Amravati), वाशीम (Washim), यवतमाळ (Yavatmal), अकोला (Akola), वर्धा (Wardha) जिल्ह्याचा समावेश आहे. आज अधिसुचना जारी केल्यानंतर या 8  ही लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज विक्री करण्यास सुरवात होईल. तसेच उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात होणार आहे. 

लोकसभा निवडणूक दुसरा टप्पा वेळापत्रक

 • नामांकन : 28 मार्च 2024
 • उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 04 एप्रिल 2024
 • नामांकनांची छाननी : 05 एप्रिल 2024
 • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख : 08 एप्रिल 2024
 • मतदान : 26 एप्रिल 2024

दुसऱ्या टप्प्यातील जिल्हे

 1. परभणी 
 2. नांदेड 
 3. हिंगोली
 4. बुलढाणा 
 5. अमरावती
 6. वाशीम 
 7. यवतमाळ 
 8. अकोला 

अनामत रक्कम भरावी लागणार…

इच्छुकांना ऑफलाईनसह सुविधा तसेच संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा मिळणार आहे. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी कोरे अर्ज मिळणे, अनामत रक्कम स्वीकारणे, नामांकन अर्ज स्वीकारणे आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 25 हजार, तर मागास प्रवर्गातील उमेदवारांना 12 हजार 500 रुपये नामांकन अर्ज सादर करताना भरणे आवश्यक आहे. 

स्वतंत्र बँक खाते नव्याने उघडावे

उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी स्वतंत्र बँक खाते नव्याने उघडावे. हे खाते उमेदवाराला स्वत:चे नावे किंवा निवडणूक प्रतिनिधीसोबत संयुक्तरित्या काढता येईल. सदर बँक खाते नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या किमान एक दिवस अगोदर उघडलेले असणे आवश्यक असून यात केवळ निवडणुकीशी संबंधीतच व्यवहार करायचे आहेत.

एनओसी अनिवार्य 

लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन भरताना उमेदवारांना निवडणूक आयोगामार्फत विविध सूचना देण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने मागील दहा वर्षाच्या कालावधीत कोणत्याही वेळी शासकीय निवासस्थानाचा ताबा घेतला असल्यास त्याच्या वापराचे संबंधीत विभागाचे भाडे, विद्युत आकार, पाणीपट्टी व दूरध्वनी आदी देयके भरुन सक्षम प्राधिकाऱ्याच्या स्वाक्षरीचे ना-देय (NOC) प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे.

मान्यताप्राप्त पक्षांना ए व बी फॉर्म दाखल करणे बंधनकारक 

मान्यताप्राप्त राजकीय पक्षाकडून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने पक्षाचे विहित नमुन्यातील ए व बी फॉर्म नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिनांकास दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल करणे बंधनकारक आहे. 

अपक्ष उमेदवारांना 10 प्रस्तावक आवश्यक 

उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करताना याच लोकसभा मतदार संघातील प्रस्तावक असणे बंधनकारक आहे. मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षाच्या उमेदवारांना एक मतदार प्रस्तावक तर अपक्ष आणि इतर राज्यातील मान्यताप्राप्त अथवा नोंदणीकृत पक्षाच्या उमेदवारांना 10 मतदार प्रस्तावक असावे. उमेदवार जर इतर जिल्ह्यातील अथवा मतदार संघातील असेल तर त्याने नामनिर्देशन पत्रासोबत संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Satara : उदयनराजेंना भाजपची उमेदवारी जाहीर होताच आमदाराने अजितदादांना स्पष्टच सांगितलं; म्हणाला, अनेकदा सांगूनही तुम्ही …

अधिक पाहा..Source link