मुंबई: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत येणार की नाही, यावरुन वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) व महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बरीच खलबतं झाली. मात्र, अखेर वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र उमेदवार लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, वंचतने बहुतांश मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. मात्र, एकाही मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आघाडी घेता आली नाही. वंचितने उमेदवार उभे केलेल्या 5 मतदारसंघातील उमेदवारांची पहिल्या 5 फेरीतील मतांची आकडेवारी आपण पाहणार आहोत. त्यामध्ये, अकोल्यातून प्रकाश आंबेडकर, परभणीतून पंजाबराव डख हे वंचितचे उमेदवार आहेत. तर, पुण्यातून वसंत मोरे (vasant More) आणि धाराशिवमधून भाऊसाहेब आंधळकर वंचितचे उमेदवार आहेत. बीडमध्ये अशोक हिंगे हे वंचितचे उमेदवार आहेत. 

लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निकालांची आकडेवारी समोर येत असून निवडणूक आयोगाच्या वेबसाईवर प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार सध्या महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडीमध्ये जोरदार लढत पाहायला मिळत आहे. त्यामध्ये , दुपारी 12 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाच्या साईटवरील आकडेवारीनुसार 5 मतदारसंघातील उमेदवारांच्या मतांची माहिती देण्यात येत आहे. 

5 मतदारसंघातील वंचितचे उमेदवार

पुणे लोकसभा मतदारसंघातून वंचितच्या वसंत मोरे यांना केवळ 11,840 मिळाली आहेत. तर, मुरलधीर मोहोळ हे 1 लाख 29 हजार 359 मतांनी सर्वात आघाडीवर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर रविंद्र धंगेकर हे 1 लाख 5 हजार 976 मतांसह आहेत. 

अकोल्यातून वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांना दुपारी 12 वाजेपर्यंत 84,556 मतं मिळाली आहेत. तर, या मतदारसंघातून काँग्रेसचे अभय पाटील हे 1 लाख 30 हजार मतांसह प्रथम क्रमांकावरील आघाडीवर आहेत. येथून भाजपचे अनुप धात्रे 14443 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. 

बीडमधून वंचितचे अशोक हिंगे यांना 3199 मतं मिळाली असून ते चौथ्या क्रमांकावर आहेत. येथून बजरंग सोनवणे 66599 मतांसह प्रथम क्रमांकाच्या आघाडीवर आहेत. तर, पंकजा मुंडे ह्या बीडमधून 59793 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या मतदारसंघात मुंडे आणि सोनवणे यांच्यात जोरदार लढत आहे. 

परभणी लोकसभा मतदारसंघातून वंचितचे उमेदवार पंजाबराव डख हे 20348 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर, या मतदारसंघातून शिवसेनेचे संजय जाधव 1 लाख 1 हजार 477 मतांसह प्रथम क्रमांकाची आघाडी घेऊन आहेत. या मतदारसंघात महादेव जानकर 81,352 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आघाडी घेऊन आहेत. 

वंचितचे धाराशिवमधील उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांना 9141 मतं मिळाली आहेत. तर, ओमराजे निंबाळकर यांनी 1 लाख 82 हजार 805 मतं घेऊन मतदारसंघात मोठी आघाडी घेतली आहे. तर, अर्चना पाटील यांना 1 लाख 9 हजार 915 मतं आहेत.  
 
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार दुपारी 12 वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे. त्यामुळे, अद्याप तरी वंचितने स्वतंत्र निवडून लढवल्याचा जास्त परिणाम झाल्याचं दिसून येत नाही. 

अधिक पाहा..Source link