Akola Crime : अकोल्यातून अतिशय धक्कादायक बातमी समोर आलीये. एका अल्पवयीन मुलीवर तिच्या मैत्रिणीच्या मदतीने 3 तरुणांनी सॉफ्ट ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध पाजून तिच्यावर सामूहिक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. हा संपूर्ण प्रकार एका वाढदिवसाच्या पार्टीमध्ये घडला होता. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी तीन तरुणांसह पीडित मुलीच्या मैत्रीणीवर गुन्हा दाखल केलाय. दरम्यान, यात बंटी सटवाले, लल्ला इंगळे आणि एक अज्ञात आरोपीचा समावेश आहे. तर पीडित मुलीची मैत्रीण पायल नामक तरुणीवरही गुन्हा दाखल करण्यात आलाये. सद्यस्थितीत या प्रकरणातील तिघेजण फरार असून पायल एकटीच अटकेत आहे. तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये.
पीडितेला जबरदस्तीने सॉफ्टड्रिंकमध्ये गुंगीचा औषध पाजलं
अधिकची माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील एक 15 वर्षीय मुलगी तिच्या चुलत मावशीकडे अकोल्यात शिकायला आली होतीय. ती अकोल्यातील एका शाळेत दहाव्या वर्गात शिकत होती. ती अकोल्यातील एका मुलीची मैत्रीण बनलीय. तिने तिची भेट तिचा मित्र बंटी सटवाले याच्यासोबत करून दिलीय. तसेच तिच्या चुलत मामीशीसुद्धा भेट करुन दिली होतीय. चुलत मामीचा पती लल्ला इंगळेने पीडित मुलीला तिचा वाढदिवस असल्याने त्याच्या घरी रात्री 12 वाजता साजरा करु म्हणून नेले. तेथून पीडितेचा मित्र बंटी सटवाले, त्याची मैत्रीण पायल हे मामीच्या घरी गेले. तेथे लल्ला इंगळे व बटी सटवाले यांनी मद्यप्राशन केलंय. त्यांनी पीडितेला जबरदस्तीने सॉफ्टड्रिंकमध्ये गुंगीचा औषध पाजलं. यानंतर दोघांनी तिच्यावर बलात्कार केलाय. त्यानंतर त्यांनी व्हिडीओ बनवले व ब्लॅकमेल केले. या प्रकरणी पायल पोलिसांच्या अटकेत असून अन्य तिघे जण फरार आहेत.
अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार, अकोल्यातील धक्कादायक घटना..
वाढदिवसाच्या पार्टीत सॉफ्ट ड्रिंकमध्ये गुंगीच औषध पाजत सामूहिक अत्याचार.
3 तरुणांसह एका तरुणीवर गुन्हा दाखल.
अकोल्यातील जुने शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..