Eknath Khadse : विनोद तावडे (Vinod Tawde) सावरलेत, ते महाराष्ट्र सोडून दिल्लीला गेलेत. मात्र पंकजा मुंडे (Pankaja Munde) मात्र अद्याप संभ्रमावस्थेत असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केलं. पंकजा मुंडे या सध्या तिर्थाटन करतायेत. त्या सध्या निर्णय घेऊ शकत नाहीत, असेही खडसे म्हणाले. पंकजा मुंडे यांना वडीलकीच्या नात्यानं सध्या कोणताच सल्ला देणार नाही. त्या स्वत:च परिपक्व आहेत. त्या परिस्थितीनुसर अधिक परिपक्व होत चालल्याचे खडसे म्हणाले. ते अकोल्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

चंद्रकांत पाटील हे खोकेवाले आमदार

मी निर्णय घेतला अन आपली दिशा ठरवली. वेगळा मार्ग अवलंबल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. पंकजा मुंडे यांना वडीलकीच्या नात्याने सध्या कोणताच सल्ला देणार नाही. त्या स्वत:च परिपक्व आहेत. त्या परिस्थितीनुसर अधिक परिपक्व होत चालल्या असल्याचे खडसे म्हणाले. जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे विरुद्ध सारे असं चित्र झालं आहे. चंद्रकांत पाटील हे खोकेवाले आमदार आहेत. ‘नया है वह’, अभी अकल कम है’ असे म्हणत खडसेंनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. कोणाला नरकासुर म्हणायचं, कोणाला बकासुर म्हणायचं हे त्यांनाचं माहीत असे खडसे म्हणाले. चंद्रकांत पाटील हे एका जाग्यावर थांबतात का? अपक्ष म्हणून विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं जिंकली. नंतर उद्धव ठाकरेंसोबत गेले. आता एकनाथ शिंदेसोबत गेल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. त्याला फार भाव देण्यात अर्थ नाही. त्याने आपल्यावर टीका केल्यावर त्याचं नाव टीव्हीवर येतं असल्याचे खडसे म्हणाले.

फडणवीसांच्या एंट्रीनंतरच राज्यातील राजकारण गढूळ झालं

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरही टीका केली. देवेंद्र फडणवीसांची 2014 मध्ये राज्याच्या राजकारणात ठळकपणे एंट्री झाली. त्यानंतरच राज्यातील राजकारण गढूळ झाल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला. फडणवीसांनी आपल्याला वैयक्तिक त्रास दिल्याचा आरोपही खडसेंनी केला. राज्याचा राजकारणाचा स्तर 2014-15 पासून खाली गेला. 2019 नंतर तर तो प्रचंड खाली गेल्याचे खडसे म्हणाले. आधी यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदेंसारखे लोक मुख्यमंत्री होऊन गेलेत. त्यांनी कधी आपला संयम सोडला नाही. पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर राजकारणाची दिशा बदलली. एकमेकांचं सुड उगवणारं अशा स्वरुपाचं राजकारण सुरू झाल्याचं खडसे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

Eknath Khadse : फडणवीसांनी वैयक्तिक त्रास दिला, त्यांच्या एंट्रीनंतरच राज्यातील राजकारण गढूळ; खडसेंचा आरोप 

 



Source link