अमरावती : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी (Sharad Pawar) पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत यावं, यासाठी अजित पवार (Ajit Pawar) प्रयत्नशील असल्याचं वक्तव्य अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केले आहे.  अजित पवार आणि अमित शाहांच्या (Amit Shah) भेटीत अनेक रहस्य दडलेले आहेत, असा गौप्यस्फोट  आमदार रवी राणा यांनी केला आहे. 

रवी राणा  म्हणाले,  शरद पवार हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत. अजित पवार हे सातत्याने शरद पवारांना मोदींसोबत सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शरद पवार  देखील यामुळे तयार झाले असतील असं मला वाटते. अजित पवार आणि अमित शहा यांच्या भेटीत भेटीत अनेक रहस्य दडलेले आहेत. राजकारणात अनेक घडामोडी घडत असतात. येणाऱ्या काळातही काही घडामोडी घडणार आहेत. शरद पवार मोदीजींचे काम बघून त्यांना नक्कीच पाठिंबा देतील.

येत्या काळात काँग्रेसचे अनेक नेते आपल्याला भाजपसोबत

रवि राणा म्हणाले,  राज्याच्या विकासासाठी पवार साहेब मोदीजींना पाठिंबा देतील आणि राज्य सरकार मजबूत करतील असं चित्र सध्या दिसत आहे. निवडणुकांपूर्वी अनेक घडामोडी घडणार आहेत.  काँग्रेसचे अनेक नेते आपल्याला भाजपसोबत दिसतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा आपल्याला मोदीजींसोबत दिसतील.

मंत्रीपद माझ्यासाठी महत्त्वाचे नाही

मंत्रिमंडळ विस्ताराची किंवा मंत्रीपदाची मी कधीही मागणी केली नाही आणि मला मंत्रीपदात इंटरेस्टही नाही. जनतेचे प्रश्न आणि जनतेचा विकास हे माझ्यासाठी प्राधान्य आहे. मंत्रीपद माझ्यासाठी महत्त्वाचे नाही. मी कधीच विस्ताराबद्दल विचारलं नाही आणि त्याची अपेक्षाही नाही, असे रवी राणा म्हणाले.  

अजित पवारांनी घेतली अमित शाहांची भेट

अमित शाह यांच्या भेटीसोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, महाराष्ट्र अध्यक्ष सुनील तटकरे हे देखील सोबत होते. मागील काही दिवसांमध्ये राज्यात राजकीय घडामोडी सुरू आहेत. मराठा आरक्षण आंदोलन, ओबीसी आरक्षण आंदोलनाचा मुद्दा तापला आहे. राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून महायुतीच्या सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याचे दिसून आले होते. त्यामुळे सरकारबद्दलची प्रतिमा चुकीची जात असल्याची चर्चा सुरू होती. त्याशिवाय, मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकटेच आंदोलनाला सामोरे जात असल्याचे चित्र होते. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणूक प्रचारात होते. तर, अजित पवार हेदेखील आजारपणात होते  

हे ही वाचा :

मराठा, धनगर, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर थेट अमित शाह लक्ष घालण्याची शक्यता, लवकरच राज्यांतील महायुतीच्या नेत्यांची घेणार बैठकSource link