अयोध्या : प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) हे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अयोध्येतून संसद भवनापर्यंत जाणार असल्याचं त्यांनी ‘एबीपी माझा’ला सांगितलं. दरम्यान अयोध्येमध्ये (Ayodhya) बच्चू कडू यांनी श्रीरामाचं दर्शन घेतलं. शेकडो कार्यकर्ते यावेळी बच्चू कडूंसोबत होते. तसेच त्यांनी मोठ्या प्रमाणात धान्य बच्चू कडूंनी श्रीरामाचरणी अर्पण केलं.

जोपर्यंत शेतकऱ्यांना आर्थिक आरक्षण मिळत नाही तोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही. त्यामुळे आता तिसऱ्या टप्प्यामध्ये बच्चू कडू यांनी संसद भवनापर्यंत जाण्याचा निर्णय घेतलाय. तसेच अयोध्येतील रामाचं दर्शन घेणं हा त्यांचा दुसरा टप्पा होता. आता तिसऱ्या टप्प्यात ते अयोध्येतून संसद भवनापर्यंत जाणार असल्याची माहिती यावेळी स्वत: बच्चू कडू यांनी दिली. 

बच्चू कडूंना काय म्हटलं?

बच्चू कडू यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना म्हटलं की, जोपर्यंत शेतकऱ्यांना आर्थिक आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांना आर्थिक आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत तो सुखी होणार नाही. आता आम्ही संसद भवनात जाऊन शेतकऱ्यांचं बजेट जाणून घेणार आहोत. सरकार इतरांना किती आणि शेतकऱ्यांनी किती बजेट मिळवून देते हे त्यांनी दाखवले पाहिजे. केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो शेतकऱ्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात बजेट मिळायला हवं. त्यामुळे जर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांचा विचार केला नाही, तर आम्ही अयोध्या ते संसद भवनापर्यंत तिसऱ्या टप्प्यात आंदोलन करु. 

बच्चू कडूंचा ताफा अडवला

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी श्रीरामाला साकडे घालण्यासाठी गेलेल्या आमदार बच्चू कडूंचा (Bachchu Kadu) ताफा पोलिसांनी अडवला आणि त्यांच्या सभेला परवानगी दिली नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या बच्चू कडू यांनी चौकातच छोटेखानी भाषण केलं. आमदार बच्चू कडू यांच्यासोबत 100 च्या वरती गाड्यांचा ताफा अयोध्यामध्ये गेला होता. पोलिसांनी फक्त पाच वाहनं घेऊन जाण्याची परवानगी दिली. 

दरम्यान बच्चू कडू यांनी आमदार खासदारांसोबत शेतकऱ्यांचा देखील तितकाच विचार करण्याची गरज असल्याचं यावेळी बच्चू कडू यांनी म्हटलं. तसेच सुरुवातीला रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी बच्चू कडू यांना अडवण्यात आलं होतं. पण त्यानंतर त्यांना परवानगी देण्यात आली. तर आता शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू संसद भवनात जाऊन कोणती भूमिका जाहीर करतात हे येत्या काळात स्पष्ट होईल. 

हेही वाचा : 

Bachchu Kadu : बच्चू कडूंना अयोध्येत अडवलं, सभेला परवानगीही नाकारली, आक्रमक बच्चू कडूंचे चौकातच भाषण Source link