Akola News : अकोला : एका सराईत गुन्हेगारावर गुन्हा दाखल करू नका म्हणून आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी अकोल्याचे (Akola News) जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्यावर आगपाखड केली आहे. आमदार अमोल मिटकरी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यातील संवादाची ऑडिओ क्लिप ‘एबीपी माझा’च्या हाती लागली आहे. मारहाणीच्या प्रकरणात गुंड सतीश वानखडेवर गुन्हा दाखल न करण्यासाठी आमदार मिटकरी यांनी जिल्हा पोलीस (Akola Police) अधीक्षकांकडे आग्रही मागणी केली आहे. राज्यात एकीकडे विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचा पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप होत असतानाच, आमदार मिटकरी यांची कथित ‘ऑडिओ क्लिप’ समोर आली आहे. अकोला शहरातील सतीश वानखडे यांच्यावर यापूर्वी अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असतांना, अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर पुढील कारवाईस मनाई केल्याने एकप्रकारे मिटकरी यांनी संशयित गुन्हेगारांची पाठराखण केल्याचे बोलले जात आहे.

अमोल मिटकरी यांच्याकडून पाठराखण?

सतीश वानखडे अकोल्यातील कृषीनगर भागातल्या पंचशीलनगर भागातला एक सराईत गुन्हेगार आहेत. अकोल्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये वानखडे यांच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. 2015 मध्ये वाणखडे यांना अकोला पोलिसांनी तडीपारीची देखील कारवाई केली आहे. सोबतच नगरसेवक अजय रामटेके प्रकरणातील आरोपी धनंजय बिल्लेवारवर यांचावर वानखडे यांनी जीवघेणा हल्ला करत या हल्यात त्यांच्या हाताची बोटे कापली होती. सुदैवाने या हल्ल्यात त्यांचे प्राण वाचले होते. मात्र, असे असताना पोलिसांनी वानखडेंवर केलेले कारवाई विरोधात अमोल मिटकरी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

या विषयी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, वानखडेवर गुन्हा दाखल केल्यास थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना याबाबत बोलल्या जाईल. सोबतच आपण कायम माझ्याशी मोठ्याने बोलता, मी एक सत्ताधारी आमदार आहे. या बाबत मी आधिवेशनात आवाज उचलून तक्रार देईल. एखादी गुन्हेगार सुधारण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला संधि दिली पाहिजे. नाही ते माझा पक्षाशी संबंधित आहे, नाही ते माझे कार्यकर्ते आहे. याबाबत मी तुमच्याशी इथून पुढे बोलणार नाही, बोलायचे असल्यास मी मुख्यमंत्र्यांशी बोलेल, असे देखील अमोल मिटकरी म्हणले.   

दबाव नव्हे विनंती- अमोल मिटकरी

याबाबत अमोल मिटकरी यांना विचारले असता ते म्हणाले की,  मी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचावर दबाव आणण्याचा कुठलाही प्रयत्न केलेला नाही, उलट मी त्यांना विनंती केली आहे. अकोल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह हे चुकीच्या पद्धतीने काम करीत असल्याने मी त्यांची लेखी तक्रार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे देखील अमोल मिटकरी म्हणाले. अकोला शहरात वाढती गुन्हेगारी आणि अपराध यावर अंकुश लावण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी कठोर कारवाई करून जिल्ह्याचा कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवावा अशी, मागणी देखील एक लोक प्रतिनिधी म्हणून आम्ही केली आहे. मात्र, आमच्याशी योग्य प्रकारे वर्तन केल्या जात नसल्याचे आरोप देखील अमोल मिटकरी यांनी केलेल्या तक्रारीत नमूद केला आहे. 

वानखडेवर कोणत्या वर्षी किती गुन्हे?

2015 : 2 आणि तडीपारी
2016 : 1
2018 : 02
20 : 01
23 : 01
2024 : 01 

महत्वाच्या इतर बातम्या 

अधिक पाहा..Source link