Navneet Rana: भाजप नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) यांचा महायुतीच्या विरोधात प्रचार सुरु आहे. दर्यापूरमधील महायुतीचे (Mahayuti) उमेदवार अभिजित अडसूळ यांच्या विरोधात उभे असलेले भाजप बंडखोरी करणारे रमेश बुंदीले यांच्या प्रचाराला नवनीत राणा सहभागी झाल्या होत्या. यावेळी नवनीत राणा यांनी जाहीर सभा घेत भाषण देखील केलं. 

दर्यापूरमध्ये महायुतीकडून शिंदे शिवसेनेने अभिजित अडसूळ (Abhijeet Adsul) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपचे माजी आमदार रमेश बुंदीले यांनी बंडखोरी करत युवा स्वाभिमान पार्टीकडून उमेदवारी घेतली. त्याच रमेश बुंदीले यांचा प्रचार करण्यासाठी भाजप नेत्या नवनीत राणा यांनी दर्यापूर मतदार संघात प्रचार सभा घेतल्या.

एकनाथ शिंदेंनी दिला होता दम-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दर्यापूरमध्ये सभा झाली ज्यामध्ये महायुतीचा धर्म पाळावा, असा दम एकनाथ शिंदेंनी राणा दाम्पत्यांना दिला. तरीही नवनीत राणा यांनी रमेश बुंदीले साठी दोन ठिकाणी सभा घेतल्या. 

सर्वांनी मिळून माझा पराभव केला- नवनीत राणा

मी कुठल्याही वादळाला घाबरत नाही. मी हा मतदारसंघ दत्तक घेतला असून युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदीले यांच्या पाठीशी उभे असल्याचं नवनीत राणा यांनी सांगितले. तसेच सर्वांनी मिळून माझा लोकसभा निवडणुकीत पराभव केला. यानंतरही मी अजिबात खचले नाही, असंही नवनीत राणा यांनी सांगितले. 

नवनीत राणा यांची महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर टीका-

नवनीत राणा यांनी दर्यापूरच्या उबाठा गटाचे उमेदवार गजानन लवटे यांच्यावर देखील टीका केली आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अभिजित अडसूळ यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. एक बँक लूटमारा आणि दुसरा दारू विकणारा आहे, अशा हल्लाबोल नवनीत राणा यांनी केला. तसेच दर्यापूरमध्ये उबाठा गटाच्या उमेदवाराचा व्यवसाय काय…?, असा सवाल उपस्थित करत महिला माझ्याकडे नेहमी यायचे की अवैध दारू बंद करा..या मतदार संघात मशाल घेऊन उद्धव ठाकरे यांनी जो उमेदवार दिला त्याचा व्यवसाय दारूचा आहे. त्या उमेदवाराला जर मतदान दिलं तर गावात तो पाईप लाईन टाकून दारू विकेल. त्यामुळे तुम्हाला कोण आमदार म्हणून हवा आहे, हे तुम्ही ठरवा, असं विधान नवनीत राणा यांनी केलं.

Eknath Shinde Amravati : त्यांना कायमचे बाहेर पाठवून द्या; शिंदेंची राणा दाम्पत्यावर जहरी टीका, Video:

संबंधित बातमी:

Ajit Pawar: चकली, गुलाबी जॅकेटपासून थंड पाणी…अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना काय काय सापडलं?

अधिक पाहा..



Source link