Nitin Deshmukh on Devendra Fadnavis :  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटीलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis)केलेल्या आरोपांना बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी समर्थन दिले आहे. आपण सुरतला असतांना फडणवीसांनी असंच इंजेक्शन देऊन संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नितीन देशमुखांनी केलाय. त्यामूळे जरांगे पाटलांनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आमदार देशमुखांनी केलीय. नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांची शेतकरी संघर्ष पदयात्रा अकोट तालूक्यातील कुटासामध्ये आली होती. यावेळी ते बोलत होते. 

आमदार नितीन देशमुख यांनी यावेळी घेतलेल्या कॉर्नर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जहरी टीका केलीय. प्रभू श्रीरामाच्या नावावर मत मागणाऱ्या भाजपने श्रीरामाची तत्व पायदळी तुडविल्याचा घणाघात त्यांनी केलाय. मुर्ती प्रतिष्ठापनेवेळी मोदी पत्नीशिवाय पुजेला एकटे कसे बसलेय?, असा सवाल त्यांनी भाजपला केलाय. 

सत्तेचा दुरुपयोग करणे, अत्याचार करणे, हा एकमेव धंदा देवेंद्रजींचा

जरांगेंच्या आरोपांना समर्थन देताना अनिल देशमुख म्हणाले, निश्चितपणे देवेंद्र फडणवीस तसे करू शकतात मला त्यांचा अनुभव आहे. मागे मी तुम्हाला सांगितले होते की, मला मारण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. या आरोपांची चौकशी व्हावी,अशी मागणी नितीन देशमुख यांनी केली आहे. फडणवीस काही करू शकतात. सत्तेचा दुरुपयोग करणे, अत्याचार करणे, हा एकमेव धंदा देवेंद्रजींचा महाराष्ट्रात सुरू आहे. मग तिच्या माध्यमातून इतर पक्षातील लोक फ़ोडत आहेत, असे नितीन देशमुख यांनी म्हटले आहे. 

मूर्ती प्रतिष्ठापनेवेळी मोदी पत्नीशिवाय पुजेला एकटे कसे बसले? 

प्रभू श्रीरामाच्या नावावर मत मागणाऱ्यांनी श्रीरामाचा आदर्श घ्यावा. प्रभू श्रीरामांनी सीता वनात असतांना केलेल्या पुजेत बसण्यासाठी  सीतामातेची सोन्याची मूर्ती बनवली होती. मूर्ती प्रतिष्ठापनेवेळी मोदी पत्नीशिवाय पुजेला एकटे कसे बसले? असा सवालही अनिल देशमुख यांनी यावेळी केला आहे. 

जरांगे पाटील यांनी कोणते आरोप केले होते?

देवेंद्र फडणवीस मला संपवण्याचा विचार करत आहेत. माझं एन्काऊंटर करण्याचा त्यांचा विचार आहे. मला सलाईनमध्ये विष देण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यामुळे मी परवापासून सलाईन घेणे बंद केले आहे, असे जरांगे म्हणाले होते. जरांगे यांनी रविवारी दि.25 अंतरवाली सराटी येथे मराठा बांधवांशी बोलताना हे आरोप केले होते.

इतर महत्वाच्या बातम्या 

Prakash Ambedkar: सहा महिन्यांपूर्वी कोणालाही माहिती नसणारा जरांगे पाटील आता शरद पवारांचा बाप झालाय: प्रकाश आंबेडकर

 

अधिक पाहा..



Source link