Akola Crime News : अकोला शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने तरुणीवर चक्क चाकू हल्ला केल्याची घटना अकोल्यात घडलीय. 25 वर्षीय तरुणानं 22 वर्षीय वैद्यकीय नर्स असलेल्या तरुणीला चाकूने भोकसून तिचा खून करण्याचा प्रयत्न केलाय. संतोष डिवरे असं चाकू हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. बोरगाव मंजू पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सध्या केला जात आहे. अकोल्यातल्या बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील सोनाळा रस्त्यावर ही घटना घडली. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नर्स असलेल्या तरुणीला चाकूने भोकसून तिचा खून करण्याचा प्रयत्न
पुढे आलेल्या माहितीनुसार, संतोष डिवरे आणि जखमी तरुणी हे दोघे चांगले मित्र आहेत. दोघेही जण बोरगाव मंजू परिसरात फिरायला गेले होते. याच दरम्यान संतोषने तरुणीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मात्र तरुणीने स्पष्ट नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला, आणि याच वादादरम्यान तरुणानी त्याच्या जवळील चाकूने तिच्यावर गंभीर स्वरूपात वार केले. या घटनेत तरुणी गंभीर स्वरूपात जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. सद्यस्थितीत तरुणीची प्रकृती स्थिर असून या घटनेने अकोला जिल्हा हादरून गेलाय. सध्या या घटनेचा अधिक तपास बोरगाव मंजू पोलीस स्टेशन करत असल्याची माहिती ठाणेदार अनिल गोपाळ यांनी दिली आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या आवारात गवताला मोठी आग
अकोला लगतच्या गायगाव येथील पेट्रोल आणि डिझेलच्या आवारात गवताला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. गायगाव येथे इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम भारत पेट्रोलियमसह अनेक इंधन कंपन्यांचे पेट्रोल आणि डिझेलचे डेपो आहेत. मात्र आग लवकर विझवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. आग वाढली असती तर गायगावसह आजूबाजूची गावं आणि अकोल्यात डाबकी रोड, जुने शहर भागात मोठे नुकसान झालं असतं. मात्र आग विझवण्यासाठी अकोला महापालिकेचं अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. पण त्याआधीच आग कंपनीतील कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी वेळीच आग विझवल्याने मोठा अनर्थ टळलाय. मात्र ही घटना घडल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली असून सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे.
हे ही वाचा
अधिक पाहा..