Amol Mitkari: अकोला : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit pawar) आपले काका म्हणजेच राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांची साथ सोडून भाजप महायुतीसोबत सत्तेत सहभाग घेतला. मात्र, शरद पवारांनी विरोधात राहणं पसंत केलं असून लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी त्यांची जादू आजही कायम असल्याचं दाखवून दिलंय. त्यातच, आता अजित पवारांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा स्थान नाही. शरद पवारांनी (Sharad pawar) अजित पवारांसाठी परतीचे दोर कापले आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आता, आमदार अमोल मिटकरी यांनी याबाबत बोलताना थेट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनाच लक्ष्य केलं आहे. कुठल्याही नेत्यांने असं व्यक्तव्य केल्याची सत्यता नाही, तसा व्हिडिओही समोर आला नाही. या केवळ मीडियातील चर्चा आहेत. काल बारामतीमध्ये एका बालिश नेत्याने ते लिहून व्हायरल केलं अन् तेच बातम्या चालवल्या जात आहेत. त्याच्याच सडक्या मेंदूतील ही घाण, असल्याचे म्हणत आमदार अमोल मिटकरी यांनी नाव न घेता आमदार रोहित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला.
अजित पवार यांनी बारामतीतील भाषणातून थेट सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल केला होता. तसेच, गेल्या काही दिवसांत त्यांच्या भाषणात झालेल्या बदलावरुन ते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका करत असल्याचं पाहायला मिळालं. बारामती लोकसभेची लढाई कोणत्याही परिस्थितीत जिंकायची असा चंग बांधलेल्या अजित पवारांनी मागचा पुढचा कोणताही विचार न करता आपल्या घरातील लोकांनाच अंगावर घेतले होते. परंतु, अलीकडच्या काळात अजित पवार यांची शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याविषयी भाषा कमालीची मवाळ झाली आहे. एवढेच नव्हे तर अजित पवार यांना आपल्या चुकांची उपरतीही झाली आहे. त्यामुळे अजित पवार पुन्हा घरवापसीच्या तयारीत आहेत का, अशी कुजबुज सुरु झाली होती. मात्र, शरद पवार गटातील एका ज्येष्ठ नेत्याने अजित पवार यांचे परतीचे सर्व दोर कापले गेले असल्याचे वक्तव्य केल्याचे वृत्त होते. आमदार मिटकरी यांनी या वृत्ताचे खंडन केले असून कुठल्याही नेत्याने तसं विधान केलं नाही.
अजित दादांना राष्ट्रवादीचे दार बंद, एन्ट्री नाही ह्या फक्त बातम्या आहेत, फक्त मनाचं समाधान होण्यासाठी हे सर्व सुरू असून यात कुठलेही तथ्य नाही, हे बिनबुडाचं आहे, असे मिटकरी यांनी स्पष्ट केलं. तसेच, कुठल्याही नेत्यांने असं व्यक्तव्य केल्याची सत्यता नाही, तसा व्हिडिओही समोर आला नाही, या केवळ मीडियातील चर्चा आहेत. काल बारामतीमध्ये एका बालिश नेत्याने ते लिहून व्हायरल केलं अन् तेच बातम्या चालवल्या जात आहेत. त्याच्याच सडक्या मेंदूतील ही घाण, असल्याचे म्हणत आमदार अमोल मिटकरी यांनी नाव न घेता आमदार रोहित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला.
मला आंदोलनासाठी निमंत्रण नव्हतं – मिटकरी
राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात राज्यभर भाजप महायुतीने आंदोलन पुकारलं होतं. ठिकठिकाणी भाजपच्या पुढाकारातून हे आंदोलन करण्यात आलं. मात्र, मला अकोल्यातील आंदोलनाचं निमंत्रण नव्हतं, त्यामुळे आपण कुठेही आंदोलनात सहभागी झालो नसल्याचंही मिटकरी यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
हेही वाचा
विधानसभेचा बिगुल वाजणार, मुंबईत आयुक्तांनी घेतला आढावा; प्रशासकीय यंत्रणा लागल्या कामाला
अधिक पाहा..