Akola Latest News Update : तुमच्या घरात जर लहान मुलं असेल तर ही बातमी वाचलीच पाहिजे. अलीकडच्या काळात आई-वडील कामात व्यस्त असताना लहान मुलांकडे लक्ष देणे कमी झाले आहे. पालकांच्या व्यस्ततेमुळे मुलांकडे लक्ष दिले जात नसल्याने अनुचित प्रकार घडल्याचे अनेकदा समोर आले आहे. नाकात  तुरीचा दाणा गेल्यामुळे अकोल्यात तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालाय. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अकोल्यातील पाटसूल येथे ही घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

तुरीचा दाणा नाकात अडकला अन्… 

तुरीचे दाणे खात असताना अचानकपणे नाकात तुरीचा दाणा अडकल्याने एका तीन वर्षीय चिमुकल्याचा तडफडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पाटसूल येथे तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. घरात आजी तुरीचे दाणे काढत होती, त्यावेळी त्यांचा नातू योगिराज अमोल इसापुरे हा आजीजवळ आला. आजीने काढून ठेवलेले तुरीचे दाणे त्या चिमुकल्याने मुठीत घेतले आणि तोंडात कोंबले. त्यातील एक दाणा मुलाच्या नाकात गेला. त्याला लगेच श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तो तडफडत असल्याचे पाहून कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात भरती करण्याचा प्रयत्न केला. परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर शोककळा पसरली आहे.  

नेमकं काय झालं होतं ?

अकोल्यातील दहीहंडा पोलिस स्टेशनच्या परिसरात 23 जानेवारी रोजी रात्री ही घटना घडली. आजी तुरीचे दाणे काढत होती. त्यावेळी नातू तिथेच खेळत होता. त्याने खेळता खेळता तुरीच्या दाणे मुठीत घेतले अन् तोंडात कोंबले. पण त्यामधील एक दाणा त्या चिमुकल्याच्या नाकात गेला. चिमुकल्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तो तडफडत होता, कुटुंबियांनी तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी पळ काढ काढला. पण वाटेतच त्या तरुणाने जीव सोडला. या घटनेमुळे पाटसूल  गावात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी अपघाती निधनाची नोंद केली आहे. 

लहान मुलांकडे लक्ष द्या 

एकीकडे सध्या सर्वांचंच आयुष्य धावपळीचं झालं आहे. महिला देखील घरातील आपलं काम करुन जॉब करत असतात. मात्र अशात लहान मुलांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे. घरातील काम करत असताना अथवा मोबाईलमध्ये व्यस्त असल्यामुळे मुलांकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे अशा दुर्देवी घटना वारंवार घडतात. त्यामुळे पालकांनी वेळीच या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे दिसते. 

आणखी वाचा :

जागावाटपाचा फॉर्मुला आज ठरणार? महाविकास आघाडीची आज महत्वाची बैठक, राजू शेट्टींना आमंत्रण नाही

अधिक पाहा..Source link