अकोला : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून विधानसभा निवडणूक 2024 ची मोठी धामधूम सुरु होती. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सामना झाला. तर दुसरीकडे प्रहारचे बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांची तिसरी आघाडी देखील निवडणुकीच्या मैदानात आहे. तिसरीकडे मनसे आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी (VBA) देखील जोरदार तयारीसह निवडणुकीला सामोरी गेली. आता राज्यभराचे लक्ष निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. टप्याटप्याने विविध मतदारसंघातील कल हाती येत आहेत. जाणून घेऊयात उत्तर महाराष्ट्रातील कुठल्या मतदारसंघात कोण आघाडीवर आहेत. (Akola Vidhan Sabha Election 2024)
अकोल्यामध्ये (Akola Vidhan Sabha Election 2024) एकूण 5 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी 2019 मध्ये झालेल्या विधानसभेला 4 मतदारसंघ हे भाजपकडे गेले होते. तर एक मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटाकडे होता. आता नेमकं कोण बाजी मारणार आणि भाजप आपल्या जागा राखण्यात यश मिळवणार का याकडे लक्ष्य लागलं होतं.
(ही यादी निवडणूक आयोगाकडून येणाऱ्या माहितीनुसार अपडेट होत आहे. ताज्या अपडेट्ससाठी ही बातमी रिफ्रेश करत राहा)
अकोला जिल्ह्यातील लढती :
एकूण मतदारसंघ : 05
मतदारसंघांची नावे : अकोला पश्चिम, अकोला पूर्व, अकोट, बाळापूर, मुर्तिजापूर (राखीव – अनुसुचित जाती)
1) अकोला पश्चिम :
प्रमुख उमेदवार :
1) साजिदखान पठाण : काँग्रेस
2) विजय अग्रवाल : भाजप
3) डॉ. अशोक ओळंबे : प्रहार
4) हरीश आलिमचंदानी : भाजप बंडखोर अपक्ष
5) राजेश मिश्रा : शिवसेना ठाकरे गट बंडखोर अपक्ष
2) अकोला पूर्व :
प्रमुख उमेवार :
1) गोपाल उर्फ आशिष दातकर : शिवसेना ठाकरे गट
2) रणधीर सावरकर : भाजप
3) ज्ञानेश्वर सुलताने : वंचित बहुजन आघाडी
3) अकोट :
प्रमुख उमेदवार :
1) महेश गणगणे : काँग्रेस
2) प्रकाश भारसाकळे : भाजप
3) दिपक बोडखे : वंचित बहुजन आघाडी
4) ललित बहाळे : स्वतंत्र भारत पक्ष – प्रहार आघाडी
4) बाळापूर :
प्रमुख उमेदवार :
1) नितीन देशमुख : शिवसेना ठाकरे गट
2) बळीराम सिरस्कार : शिवसेना शिंदे गट
3) नातिकोद्दीन खतीब : वंचित बहुजन आघाडी
4) कृष्णा अंधारे : राष्ट्रवादी अजित पवार बंडखोर अपक्ष
5) मुर्तिजापूर : (राखीव – अनुसुचित जाती)
प्रमुख उमेदवार :
1) सम्राट डोंगरदिवे : राष्ट्रवादी शरद पवार
2) हरीश पिंपळे : भाजप
3) डॉ. सुगत वाघमारे : वंचित बहुजन आघाडी.
4) रवी राठी : प्रहार
(ही यादी निवडणूक आयोगाकडून येणाऱ्या माहितीनुसार अपडेट होत आहे. ताज्या अपडेट्ससाठी ही बातमी रिफ्रेश करत राहा)
अधिक पाहा..