<p>अकोला जिल्ह्यातील आलेगाव येथील 20 वर्षीय मुलाचं धर्मांतर केल्याचा प्रकार समोर आलाय. याप्रकरणी मुलाच्या आईने पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी 4 आरोपींना अटक केलीये.चौघांवर अॅट्रोसिटीसह धमकावण्याचाही गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.. गावातील एका हिंदू दलित तरूणानं मुस्लीम धर्म स्वीकारला. त्याने २१ नोव्हेंबर २०२२ रोजी इस्लाम कबूल केल्याचं शपथपत्रावर लिहिलंय. धर्मांतरानंतर तो आपलं नाव आता ‘मोहम्मद अली’ असं सांगतोय. त्याचं धर्मांतर बुलडाणा जिल्ह्यातील उंद्री गावातील मदरशात झाल्याचं त्याच्या आईनं म्हटलंय.</p>
Source link