Akola Monkey : हनुमान जयंतीनिमित्त अनोखी पंगत, शिस्तबद्ध पंगतीत यथेच्छ ताव अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालूक्यातील कोथळी बुजरूक गावात आज हनुमान जयंतीनिमित्त एक अनोखी पंगत पार पडलीय. ही पंगत देण्यात आली होतीय माकडांना. गावातील मुंगसाजी महाराज संस्थानच्या वतीनं माकडांना मिष्टान्नाची पंगत देण्यात आलीय. विशेष म्हणजे माकडांनीही अगदी शिस्तीत हा पंगतीचा आस्वाद घेत मिष्टान्नांवर ताव मारलाय. या अनोख्या पंगतीचे व्हिडीओ सध्या व्हायरल होतायेत. रामदास महाराज शिंदे यांनी माकडांना ही पंगत दिलीये.Source link