Vidarbha Weather Update आकोल : विदर्भात अवकाळी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता उष्णतेच्या पातळीनेही नवे उच्चांक गाठायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील (Vidarbha) जवळ जवळ सर्व जिल्ह्यांतील उष्णतेचा पाऱ्याने चाळीशी ओलांडली असून अचानक तापमानात (Temperature) मोठी वाढ झाल्याने सारेच हैराण झाले आहे. तर गेल्या काही दिवसांपासून एकट्या अकोला (Akola) शहरात उष्णतेची लाट आल्याचे चित्र बघायला मिळाले आहे. परिणामी, उष्णतेचा धोका लक्षात घेता अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी अकोला (Akola) जिल्ह्यात 31 मे पर्यंत कलम 144 अन्वये जमावबंदी लागू केली आहे.  

हा आदेश त्यांनी शनिवार 25 मे रोजी निर्गमित केला आहे. दरम्यान आज अकोल्यात 45.06 अंश एवढं तापमान (Summer) नोंदवण्यात आलंय. तर अकोल्यातल्या राणी सती मंदिराच्या पाठीमागे असलेल्या मुख्य रस्त्यावर एक व्यक्ती मृतावस्थेत आढळला आहे. प्रथमिक माहितीनुसार या व्यक्तीचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा, असा संशय व्यक्त केला जातोय.  

अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी?

अकोल्यातल्या राणी सती मंदिराच्या पाठीमागे असलेल्या मुख्य रस्त्यावर एक व्यक्ती मृतावस्थेत आढळून आला आहे. या मृत व्यक्तीचे वय 50 ते 53 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. मोहन गजानन खाडे असं या मृत व्यक्तीचे नाव असून त्याचा मृत्यू उष्माघातानं मृत्यु झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. कारण मृत व्यक्तीकडे शासकीय रुग्णालयाची चिट्ठी सापडली आहे. त्यात लूज मोशन, मळमळ होऊनं उलटी होणे, चक्कर येणे, असा मोहनला त्रास असल्याचे नमूद आहे. त्यामुळ त्याचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय. विशेष म्हणजे मोहन गेल्या अनेक दिवसापासून घराबाहेर आहे आणि रस्त्यावरच राहून उदरनिर्वाह करायचा. मिळेल त्या जागेवर झोपायचा. मात्र,शवविच्छेदन अहवाल आल्याशिवाय हा मृत्यू उष्माघाताने झाला, असे म्हणता येणार नाही, असे पोलिसांचं म्हणणे आहे.

दरम्यान अकोला जिल्ह्याचे तापमान सध्या गेल्या 4 दिवसांपासून 45 अंशापार पोहोचले आहे. या वाढत्या तापमानामुळे उष्माघाताने बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. त्यामुळे अकोल्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं क़लम 144 लागू करण्यात आली आहे. म्हणून नागरिकांनी उन्हापासून बचावाकरिता काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय.

अकोल्यातील मागील काही दिवसांतील तापमान-

  तारीख       तापमान 

14 मे रोजी     41.08
15 मे रोजी :   40.09
16 मे रोजी :   42.04
17 मे रोजी :   40.02
18 मे रोजी :   42.00
19 मे रोजी :   43.02
20 मे रोजी :   43.08
21 मे रोजी :   43.08
22 मे रोजी :   44.08
23 मे रोजी :   45.05
24 मे रोजी     45.08 (अंश सेल्सियस सर्वाधिक तापमान नोंद)
25 मे रोजी :   45.06 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..Source link